श्रीलंकेत आणीबाणीसह पोलीस कर्फ्यू लागू, भारताने मदतीसाठी डिझेलची खेप पाठवली..
जाळपोळ, हिंसाचार, निदर्शने, सरकारी मालमत्तेची तोडफोड श्रीलंकेत खाण्यापिण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे झाली. प्रदीर्घ वीज कपात आणि इंधनाची कमतरता यामुळे लोकांच्या त्रासात भर पडली. देशातील बिघडलेली परिस्थिती पाहून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी लागू केली आहे. ५०० रुपये किलो तांदूळ, २९० साखर ; अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या.. श्रीलंका आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे….
