पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३,६०० रुपये मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर..
राज्यामधील पूरग्रस्तांकरीता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला असून एनडीआरएफ ( NDRF) च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत म्हणून मिळणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच बैठक होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्र्यांची हजेरी होती. राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असून…