पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३,६०० रुपये मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर..
राज्यामधील पूरग्रस्तांकरीता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला असून एनडीआरएफ ( NDRF) च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत म्हणून मिळणार आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच बैठक होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्र्यांची हजेरी होती. राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असून यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्व प्रशासकीय प्रदेशातील अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची जाहीर मागणी विरोधी पक्षाने केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर केली आहे. त्यानुसार पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी १३,६०० रुपयांची मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे, तसेच आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
या बैठकीत शिंदे म्हणाले की, राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या अतिृष्टीमुळे मध्ये सुमारे १५ लाख हेक्टर अथवा त्यापेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे, किंबहुना आत्तापर्यंत आलेल्या १५ लाख हेक्टर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ ( NDRF) च्या नियमांनुसार जेवढी मदत दिली जात होती, त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असून दोन हेक्टर पर्यंतची जी मर्यादा होती वाढवून आता तीन हेक्टरपर्यंत मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी नियमानुसार हेक्टरी ६,८०० रुपये मदत म्हणून मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजेच १३,६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.