रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल! या नवीन प्रक्रियेबद्दल जाणून घ्या..
तुम्ही भारतीय रेल्वेच्या सेवेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. IRCTC ने आपल्या रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. जर तुम्ही नेहमी IRCTC ॲप किंवा वेबसाइट (IRCTC App) द्वारे रेल्वे तिकीट बुक करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, रेल्वेने बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. आता प्रवाशांना तिकीट बुक करण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी लागणार आहे.
पडताळणीसाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरा
पडताळणीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वापरावा लागेल. याशिवाय तुम्ही आता तिकीट बुक करू शकणार नाही. भारतीय रेल्वेची उपकंपनी IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, आता प्रवाशांना पडताळणी केल्याशिवाय तिकीट ऑनलाईन बुक करता येणार नाही.
या प्रवाशांना करावे लागणार व्हेरिफिकेशन
लक्षात घेण्यासारखे हे आहे की IRCTC, चा हा नवीन बदल फक्त त्या प्रवाशांना लागू होईल ज्यांनी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत एकही रेल्वे तिकीट बुक केले नाही. दुसरीकडे, जर तुम्ही नियमित तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला ही प्रक्रिया फॉलो करावी लागणार नाही.
अशा प्रकारे करा मोबाईल नंबर आणि ई-मेलद्वारे पडताळणी-
● पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही IRCTC च्या ॲप किंवा वेबसाइटला भेट द्या.
● त्यानंतर सत्यापन विंडोवर क्लिक करा.
● येथे तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी टाका.
● खालील माहितीची पडताळणी करा.
● येथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी मिळेल, तो एंटर करा.
● तुम्ही OTP टाकताच तुमचा नंबर आणि ईमेल आयडी पडताळला जाईल.
● यानंतर तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट सहज बुक करू शकता.