हर घर कुछ कहता है ! तुमच्या घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला पाहिजे? जाणून घ्या हि रंजक माहिती.

सध्याच्या काळात प्रत्येकजण यश, किर्ती आणि पैसा यांच्या मागे धावताना दिसत आहे. यापैकी काही जण यशाच्या शिखरावर पोहोचतात. मात्र, काही जणांकडे गुणवत्ता असून सुध्दा अपेक्षित यश मिळत नाही. व त्यासाठी अनेकजण नशीबाला दोष देतात. पण खूप वेळेस तुमच्या घराचे वास्तुशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावत असते, याची कोणी कल्पना सुद्धा करु शकत नाही.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रमुख दरवाज्यावर कशाची सावली पडता कामा नये. त्यामुळे दरवाजाच्या समोर एखादे झाड किंवा खांब नाही, याची खात्री करा. तसेच मुख्य दरवाजापर्यंत यायला पायऱ्या असल्यास त्यांची संख्या विषम म्हणजेच ३, ६, ९, च्या पटीत असावी.

घराच्या दरवाजाच्या लांबी × रुंदीचे गुणोत्तरही महत्त्वाचे असते. समजून घ्या तुमच्या दरवाजाची उंची जर १० फूट असेल तर त्याची रुंदी ५ फूट असायला हवी.

घरचे तोंड ज्या दिशेला असेल त्याच दिशेला घराचा मुख्य दरवाजा पाहिजे. नसता घरात सकारात्मक उर्जा येणार नाही.

घराच्या मुख्य दरवाजाची उंची इतर खोल्यांच्या उंचीपेक्षा जास्त असावी. मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असल्यास घरात पैश्याची रेलचेल असते. पूर्वेला असल्यास घरात शांतता नांदते तर पश्चिम दिशेला असल्यास भाग्योदय होतो.

घरातील देवघर कुठे असायला पाहिजे?

ईशान्य भागाकडील प्रभागात देवघर असावे. या भागामध्ये अभ्यास, वाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ध्यानधारणा इ. अवश्य करावी. देवघर येथे घेणे शक्य नसेल तर निदान जप-जाप्य, पोथी वाचन, ध्यान करण्यासाठी याच दिशेला यावे.

स्वयंपाकघर कुठे असायला पाहिजे?

स्वयंपाकघर घरातील आग्नेय दिशेला असणे अधिक शुभ मानले जाते. आग्नेये मध्ये स्वयंपाकघरा शिवाय लहान मुलांची झोपण्याची व्यवस्था करणे हे शरीरसंपदा व बौद्धिक संपदा वाढण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. तसेच व्यायामासाठी सुद्धा हा भाग चांगला असतो.

घराचे मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावे, मुख्य दरवाजा दररोज स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य दरवाज्याला एक प्रकारे घराचा चेहराच समजला पाहिजे, ज्या प्रमाणे प्रत्येक जण आपला चेहरा स्वच्छ ठेवतात, अगदी त्याच प्रमाणे घराचा मुख्य दरवाजा देखील नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. असे केल्याने कधीही पैशाची टंचाई भासत नाही.

घराचा मुख्य दरवाजा तुटलेला असेल किंवा आवाज करत असेल तर ते लगेच दुरुस्त करा. कारण घर खूप चांगलं असलं तरी मुख्य दरवाजा व्यवस्थित उघडत नाही, नाहीतर लटकून जमिनीवर घासायला लागतं, अशा घरांमध्ये नोकऱ्यांबाबत अडचणी येतात.

घराचा मुख्य दरवाजा हा खूप लहान किंवा खूप मोठा सुद्धा नसावा. ते घराच्या प्रमाणात असावे. खूप मोठा दरवाजा असल्यास घरात पैसा थांबत नाही. रोज काही ना काही खर्च इथेच राहतो.

दरवाजा हा अतिशय पातळ सुद्धा नसावा. दरवाजा पातळ असल्यास आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. पण दरवाज्याचे वाकडे असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे मनाचे संतुलन बिघडते. कौटुंबिक शांततेवर परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!