“WhatsApp वर आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे? पाहा ही सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत”.

आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. बँकिंग सेवा, सरकारी योजना, मोबाईल सिम, पासपोर्ट, सबसिडी अशा अनेक कामांसाठी आधार अनिवार्य झाला आहे. अशा परिस्थितीत जर आधार कार्ड हरवले किंवा त्याची तात्काळ प्रत आवश्यक असेल, तर आता तुम्ही WhatsApp च्या माध्यमातून सहजपणे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

WhatsApp द्वारे आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

WhatsApp च्या मदतीने आधार डाउनलोड करण्यासाठी सरकारने DigiLocker सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा वापर करून काही मिनिटांत e-Aadhaar मिळवता येतो.

सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये +919013151515 हा अधिकृत नंबर सेव करा. त्यानंतर WhatsApp उघडून या नंबरवर “Hi” किंवा “Namaste” असा मेसेज पाठवा. पुढे तुम्हाला DigiLocker सेवांचा पर्याय दिसेल. त्यात DigiLocker निवडा.

यानंतर तुम्हाला DigiLocker खाते तयार करण्यास सांगितले जाईल. खाते तयार केल्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाकून ओळख पडताळणी पूर्ण करा.

व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुमच्यासमोर आधारशी संबंधित सर्व कागदपत्रांची यादी दिसेल. त्यामधून “Aadhaar” निवडा आणि PDF स्वरूपात डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर तुमचा e-Aadhaar WhatsApp वर उपलब्ध होईल

वेबसाईटवरून आधार कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत

जर तुम्हाला WhatsApp वापरायचा नसेल, तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरूनही आधार डाउनलोड करू शकता.

त्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइटला भेट द्या आणि “Download Aadhaar” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, एनरोलमेंट आयडी (EID) किंवा व्हर्च्युअल आयडी (VID) यापैकी कोणतीही माहिती टाका. पुढे स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरून “Send OTP” वर क्लिक करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर तुम्ही e-Aadhaar PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.

महत्त्वाच्या गोष्टी

आधार डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. डाउनलोड केलेली PDF फाइल पासवर्डने सुरक्षित असते. सामान्यतः पासवर्ड हा तुमच्या नावाच्या पहिल्या चार मोठ्या अक्षरांबरोबर जन्म वर्ष असा असतो.

या सोप्या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

Similar Posts