पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…

औरंगाबाद शहरा जवळील धरनपूर गावाच्या भांगसी माता गड येथे तीन जिवलग मित्रांवर काळाने झडप घातली आहे.

शरणापूर शिवारात भांगसी गडच्या पायथ्याशी नारायण वाघामारे यांचे शेततळे आहे. सायकलवर फिरण्यासाठी गेलेले तीन मित्र या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांनी अग्निशामक विभागाला दिली. अग्निशामक दलाच्या मुख्य अधिकारी आरती सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. ते मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सिराज संजय पवार (१६), प्रतीक आनंद भुसे (१६), तिरुपती मारुती कांदळकर (१६) असे मृत्यू झालेल्या मित्रांचे नाव असून ते तिघेही सारा संगम बजाज नगर येथील रहिवासी होते. हे तिघेही एकाच गावाचे रहिवासी असल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदरील तरुण २० फेब्रुवारी रोजी पाण्यात बुडाले होते. त्यांना आज शेततळ्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. सदर घटनेची नोंद दौलताबाद पोलिसांनी घेतली असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजश्री खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौलतबाद पोलीस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!