PM Kusum Scheme : कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना देत आहे ९० % अनुदान, मिळणार मोठा फायदा….

PM Kusum Scheme: केंद्र सरकार पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगले पीक घेता यावे म्हणून सोलर पंप बसवण्याची सुविधा पुरवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान Solar Pump Yojana Subsidy देण्यात येते. या योजनेचा खूप शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. जाणून घेऊया पीएम कुसुम योजनेबद्दल सविस्तर.

ही सरकारी योजना Govt Schemes शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी खूप मदत करते. शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्यूबवेल वापरतात. याद्वारे नापीक जमीन देखील वापरात आणली जाऊ शकते. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगल्या सुविधा मिळू शकतात.

मिळेल ९० टक्के अनुदान

ही योजना ऊर्जा मंत्रालयाने सन २०१९ मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फक्त १० टक्के रक्कम द्यावी लागेल. ३०% अनुदान केंद्र सरकार, ३०% राज्य सरकार आणि ३०% इतर वित्तीय संस्थांद्वारे दिले जाते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना वीज आणि डिझेल खर्च करावे लागत नाही आणि त्यांचे विजेवरील अवलंबित्वही कमी होते. त्यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.

कुसुम योजनेसाठी पात्रता :
◆ अर्जदार हा भारताचा रहिवासी असला पाहिजे, तरच त्याला या PM Kusum Yojana योजनेचा लाभ मिळू शकेल.
◆ PM Kusum Yojana / पीएम कुसुम योजनेसाठी अर्जदार हा शेतकरी असावा.
◆ अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असावे आणि त्यात आधार कार्ड लिंक केलेले असावे
◆ अर्जदाराकडे आम्ही खाली दाखवलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध असली पाहिजेत

पंतप्रधान कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: –PM Kusum Yojana
◆ आधार कार्ड
◆ फोटो
◆ रेशन कार्ड
◆ उत्पन्नाचा दाखला
◆ मतदार ओळखपत्रबँक खाते पासबुक
◆ शेत-जमिनीची कागदपत्रे , 7/12
◆ मोबाईल नंबर

असा करा अर्ज

तुम्ही केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जाऊन त्याचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता.
ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल जसे की, आधार कार्ड, सातबाऱ्यासह जमिनीची कागदपत्रे, एक घोषणापत्र, बँक खाते तपशील इत्यादी. किंवा तुम्ही या महाराष्ट्र पीएम कुसुम योजना नोंदणी लिंकवर क्लिक करा.

Link : https://pmkusum.mnre.gov.in/landing-farmer_registration.htmlPM-Kusum-Solar-yojana-registration
◆ या web पेजवर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. जसे की, अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती, नाव, आधार कार्ड, मोबाईल नंबर इत्यादि.
आता तुम्हाला Register/Apply वर क्लिक करावे लागेल.
◆ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर “Download Acknowledgement Slip” या बटण वर क्लिक करून पावती डाउनलोड करा. काही मदत हवी असेल तर या नंबर वर 1800-180-3333 संपर्क करा.
Toll Free Number : 1800-180-3333 and MSEDCL Toll-Free number 1800-212-3435

अधिकृत वेबसाइट्स :
◆ India PMO Link : https://www.india.gov.in/spotlight/pm-kusum-pradhan-mantri-kisan-urja-suraksha-evam-utthaan-mahabhiyan-scheme
◆ Official Website : https://pmkusum.mnre.gov.in/
◆ Official Scheme : https://mnre.gov.in/solar/schemes/
◆ Maharashtra Website : https://www.mahadiscom.in/pm-kusum/A/index.php

वीज विकूनही करता येईल कमाई

सोलर पंपाचा उपयोग केवळ शेती आणि सिंचनासाठीच नाही तर वीजनिर्मितीसाठीही करता येतो. या योजनेद्वारे वीज किंवा डिझेलवर चालणाऱ्या सिंचन पंपांचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये रूपांतर करता येईल. त्यानंतर जी वीज शिल्लक राहते ती वितरण कंपन्यांना विकता येईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा तो चांगला स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!