Cast validity certificate: विद्यार्थ्यांनो, जात-वैधताची काळजी नको! १५ दिवसांच्या आत मिळेल जातवैधता प्रमाणपत्र; ‘ही’ कागदपत्रे जोडून ‘असा’ करा अर्ज…

Cast validity certificate : १०वी-१२वी परीक्षेनंतर आता पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थी कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी कसलीही अडचण येऊ नये याकरिता जात पडताळणी समिती तर्फे आता मात्र १५ दिवसांच्या आत जात-वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे.

जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असा करा अर्ज..
जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम www.bartyvalidity.gov.in आणि www.ccvis.com या वेबाईटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यावेळी आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढावी आणि सर्व मूळ कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज द्यावा लागणार आहे. समितीच्या माध्यमातून त्या अर्जांची पडताळणी होते आणि परिपूर्ण प्रस्ताव असल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या ‘ई-मेल’वर ऑनलाइन पाठवले जाते.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांकडे त्यांचे वडील, आजोबा, पणजोबाचे १९५०-६० वर्षांपूर्वीचे काहीच शैक्षणिक कागदपत्रे नसल्यास तत्कालीन कालावधीतील खरेदी दस्तऐवज, फेरफार किंवा ‘देवी’ची लस टोचल्याचे कागदपत्र तथा जन्म-मृत्यूची ग्रामपंचायतीतील नोंद, यापैकी कोणतेही एक कागदपत्र द्यावे लागणार असून त्यावर जातीची नोंद असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा किंवा घेतला आहे, तेथील प्राचार्यांनी भरून दिलेला ‘१५-अ’चा अर्ज आणि त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांची जात पडताळणी करून मिळावी, असा एक अर्ज देखील घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे जात पडताळणी समितीने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!