औरंगाबादेतील इयत्ता 8 वी, 9 वी व 11 वी च्या शाळा/वर्ग सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी !
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता ८ वी ९ वी व ११ वी च्या शाळा/वर्ग दि. ३१ जानेवारी पासून सुरू करण्यास मान्यता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश त्यांनी आजच पारित केला आहे. मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे.