औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची घोडदौड सुरूच..! आज तब्बल साडे-अकराशे नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी एकूण 1 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 512 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 6 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 512 जणांना (मनपा 338, ग्रामीण 174) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 58 हजार 941 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 671 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (758)
घाटी परिसर 6, कॅन्सर हॉस्पीटल परिसर 1, आर्मी कॅम्प छावणी परिसर 7, संजय नगर 1, भावसिंगपुरा 1, नंदनवन कॉलनी 5, उस्मानपूरा 6, पैठण रोड 2, बायजीपुरा 1, मोती नगर 1, कैसर कॉलनी 1, शहागंज 1, वेदांत नगर 2, उल्का नगरी 1, सिग्मा हॉस्पीटल परिसर 9, बेगमपुरा 3, भोईवाड 1, भडकल गेट 1, जुना खोकडपुरा 1, सिडको परिसर 3, ज्यूबली पार्क 1, कोहिनूर कॉलनी 2, पडेगाव 2, जाधववाडी 1, मुकंदवाडी 1, मिलकॉर्नर 1, शहानुरवाडी 1, एन-6 येथे 4, एन-7 येथे 7, सुराणा नगर 1, चिकलठाणा 3, एन-5 येथे 4, एन-1 येथे 3, एन-9 येथे 7, एन-8 येथे 6, राधास्वामी कॉलनी 2, एन-4 येथे 1, एन-12 येथे 1, यशोधरा कॉलनी 1, एकता नगर 1, पिसादेवी परिसर 2, अविष्कार कॉलनी 1, राजे संभाजी कॉलनी 1, एन-11 येथे 1, प्रियदर्शनी कॉलनी 1, वानखेडे नगर 2, हडको परिसर 1, हर्सुल 1, इटखेडा 1, अन्य 643
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (391)
औरंगाबाद 81, फुलंब्री 15, गंगापूर 68, कन्नड 44, खुलताबाद 22, सिल्लोड 24, वैजापूर 65, पैठण 64, सोयगाव 8
मृत्यू (02)
घाटी (01)
1. 54 पुरुष, सराफा श्रीमंत गल्ली, औरंगाबाद
खासगी (01)
1. 88 पुरुष, भालगाव, ता.औरंगाबाद