कोरोनामुळे नोकरी गेल्यानंतरही मिळणार पगार, जाणून घ्या काय आहे सरकारची योजना..

कोरोनाच्या काळात तुमचीही नोकरी गेली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण मोदी सरकार अशा 40 लाख लोकांना येत्या जूनपर्यंत त्यांना बेरोजगारी देणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारने ESIC च्या देखरेखीखाली अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना (ABVKY) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, सरकार अशा लोकांना बेरोजगारी भत्ता देणार आहे ज्यांनी कोरोना महामारीमध्ये आपली नोकरी गमावली आहे. एका अंदाजानुसार या योजनेत 40 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना ESIC कडून विमाधारक कर्मचार्‍यांना त्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोख भरपाईच्या रूपात दिलासा देते. तिथं मिळत असेल तितका पगार मिळणार नसला, तरी पात्र व्यक्तीला जूनपर्यंत पगाराची 50 टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे.

सरकारने दिलेल्या या पेमेंटचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती दरमहा 30,000 कमावते, तर त्याच्या 90 दिवसांच्या सरासरी कमाईच्या 50% 90 हजार म्हणजेच सुमारे 45 हजार रुपये त्याला 2 वर्षांत दिले जातील. मात्र, मोदी सरकारच्या अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ फक्त त्या व्यक्तींना मिळेल जे असंघटित क्षेत्रात काम करत आहेत, त्यांचे पैसे पीएफ किंवा ईएसआयसीमध्ये कापले गेले आहेत. कोरोनाच्या काळात अशा लोकांच्या नोकऱ्या गेल्यास केंद्र सरकार (अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना) त्यांना आर्थिक मदत करेल.

या लोकांचा योजनेत समावेश नाही.

या योजनेअंतर्गत, विमाधारकाच्या बेरोजगारीच्या बाबतीत, नवीन रोजगाराच्या शोधात रोख मदत रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. यासाठी, बेरोजगारीपूर्वी 2 वर्षातील प्रत्येक योगदान कालावधीत किमान 78 दिवस योगदान देणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ कोणत्या व्यक्तीला मिळणार नाही, हेही जाणून घेतले पाहिजे. चुकीच्या वागणुकीमुळे किंवा चुकीच्या कामामुळे एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली, गुन्हा दाखल झाल्यानंतर, कंपनी त्याला नोकरीवरून काढून टाकते, तर अशा व्यक्तीला अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगारी भत्ता मिळणार नाही. ज्यांनी स्वतःच्या इच्छेने नोकरी सोडली आहे, म्हणजे स्वेच्छानिवृत्ती सेवा किंवा VRS घेतली आहे, त्यांना या योजनेत समाविष्ट केले जाणार नाही.

असा करा अर्ज.

सर्वप्रथम तुम्हाला ESIC च्या www.esic.nic.in या वेबसाइटवर जावे लागेल. बेरोजगार भत्त्याचा लाभ घेण्यासाठी, फॉर्म डाउनलोड करा आणि तो रीतसर भरा. यानंतर, ते ESIC च्या जवळच्या शाखेत जमा करा. फॉर्मसोबत नोटरीचे प्रतिज्ञापत्र जोडावे लागेल, ज्यामध्ये 20 रुपयांचा स्टॅम्प पेपर जोडणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!