चार हजार लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवून देतो म्हणत औरंगाबाद मधील ‘नैवेद्य’ हॉटेल मालकाला घातला 41 लाखांचा गंडा!

मुंबई येथील जेजे हॉस्पिटल मधील 4000 लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवून देतो, असे लालाच दाखवत औरंगाबाद येथील प्रसिद्ध हॉटेल नैवेद्यच्या मालकाला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहेत.

जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 41 लाख उकळले

जेजे हॉस्पिटल मधील 4000 लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवण्यासाठी अनामत रक्कम म्हणून 70 ते 80 लाख रुपये द्यावे लागतील, असे हॉटेल नैवेद्यच्या मालकाला सांगण्यात आले होते. त्यानुसार नैवेद्य हॉटेलचे मालक भक्तबंधू रामचंद्र पाढी यांनी आतापर्यंत 41 लाख 5 हजार रुपये दिले होते पण अद्यापपर्यंत त्यांना कोणतेही टेंडर मिळाले नाही, तेव्हा त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली व नंतर नंतर तर पाढी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली.

या प्रकरणी आता एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी रजनी रानमारे (प्रतापनगर, औरंगाबाद), दुसरा संदीप बाबुलाल वाघ (मुलुंड, मुंबई) तर तिसरा स्वप्नील भरत नांद्रे (नाशिक) येथील रहिवासी आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

कशी केली फसवणूक?

या प्रकरणात आरोपींनी पाढी यांना विश्वासात घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठी सरकारी कार्यालये, हॉस्पिटलच्या कँटीनला अन्नपुरवठा करण्याचे टेंडर घेऊन त्यांना जेवण पुरवण्याचे काम करतो तेसच आमची आर. बी. केटरर्स व फूड सप्लायर्स या नावाने 12 स्वरुप निकेतन, बामणवाडा, अंधेरी प. येथे फूड सप्लायची फर्म असल्याचे सांगितले. जर तुम्हाला मुंबई मधील जे जे हॉस्पिटल येथे 4000 लोकांना जेवण पुरवण्याचे काम करायचे असल्यास त्यासाठी अनामत रक्कम भरण्याची अट घातली. त्यानुसार पाढी यांनी आतापर्यंत आरोपींना 41 लाख 5 हजार रुपये दिले होते.

Similar Posts