लज्जास्पद! महिलेवर तिच्याच मुलासमोर केला आळीपाळीने बलात्कार.

तब्बल दीड महिने एका खोलीत डांबून ठेवून महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या संभाजी आसाराम शिंदे असे आरोपीचे नाव असून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

तुला व तुझ्या मुलाला कंपनीत कामाला लावून देतो, अशे सांगत सदर महिलेला तब्बल दीड महिना क्रांती चौक परिसरातील खोलीमध्ये डांबून दोघांनी तिच्या मुलासमोरच आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजीने एका महिला व तिच्या मुलाला कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते.

त्यानुसार आरोपी संभाजीने महिलेला 26 नोव्हेंबर 2021 रोजी मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे गेट नंबर 56 येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर कंत्राटदार असलेला संभाजी शिंदेने महिलेसह तिच्या मुलाला रिक्षामध्ये बसवून त्या दिवशी शेंद्रा MIDC येथील एका कंपनीमध्ये काम दिले. काम संपल्यानंतर महिलेला आणि मुलाला घरी सोडतो म्हणून स्वतःच्या गाडीत बसवले. पण त्या महिलेला तिच्या घरी न नेता क्रांती चौक परिसरातील एका खोलीवर नेले.

त्यानंतर त्या खोलीवर पीडित महिलेवर कंत्राटदार शिंदे आणि त्याच्या एका मित्राने तब्बल दीड महिने अत्याचार केले. पीडित महिलेने 15 जानेवारी रोजी संभाजी शिंदे याच्या तावडीतून मुलाने कशीबशी सुटका करून घेत मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले, त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस गुन्हा दाखल झाला होता. त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!