शिवजयंतीमुळे औरंगाबाद शहरातील वाहतूक मार्गात बदल..
शिवजयंतीनिमत्त पुढील दोन दिवस औरंगाबाद शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून नागरिकांनी यानुसार सहकार्य करावे असे आवाहन, वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे.
औरंगाबाद शहरातील वाहतुकीमध्ये काय बदल?आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत आणि उद्या दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत क्रांती चौक परिसर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.
सिल्लेखाना ते क्रांती चौक, गोपाल टी ते क्रांती चौक, सतीश मोटर्स ते अमरप्रीत चौक आणि अमरप्रीत चौक ते सतीश मोटर्स हा पुलाच्या बाजूचा सर्व्हिस रोड सुद्धा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील.
तसेच वाहतूक करण्यासाठी गोपाल टी-संत एकनाथ रंगमंदिर-काल्डा कॉर्नर-अमरप्रीत चौक या मार्गासह सिल्लेखाना चौक- सावरकर चौक- सतीश मोटर्स तसेच शिवाजी हायस्कूल हा पर्यायी रस्ता आहे.
क्रांती चौक उड्डाणपुलावरील वाहतूक सुरु राहणार.
क्रांती चौक उड्डाण पुलाच्या पूर्वेकडील दोन्ही बाजूंचा सर्व्हिस रोड आणि क्रांती चौक उड्डाण पूल पश्चिमेकडील दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड बंद ठेवण्यात येणार आहेत.