24 फेब्रुवारीला सोन्याच्या भावात लागली आग, जाणून घ्या ताजे दर..

सोन्याच्या दरात मोठी उसळी आली आहे. 2022 मध्ये सोन्याचा भाव 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर असेल, असा तज्ञांचा अंदाज आहे. सोन्याने 1.42 टक्‍क्‍यांनी झेप घेतली असून, चांदी 1.40 टक्‍क्‍यांनी वधारली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. भारतीय सराफा बाजारात 23 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमती नोंदवण्यात आल्या होत्या. तर त्याचवेळी 24 फेब्रुवारीलाही सोन्याच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळाली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 1.42 टक्के वाढला आहे, तर चांदी 1.40 टक्क्यांनी वधारली आहे. 2022 मध्ये सोन्याचा भाव 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर असेल, असा तज्ञांचा अंदाज आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आजच्या व्यवहारात, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1.42 टक्क्यांनी वाढून 51,095 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 1.40 टक्क्यांनी वाढून 65,490 रुपये प्रति किलोवर आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची:

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर ॲपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या ॲपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो की, या ॲपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या ॲपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

● 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते

● 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिलेले असते.

● 21 कॅरेट सोन्याची ओळख 875

● 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 असे लिहिलेले असते

● 14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले होते

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत

तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदा किंमत तपासणे महत्त्वाचे आहे. दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या बसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 8955664433 वर मिस कॉल करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला नवीनतम दर सांगितले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!