मोठी बातमी! PM मोदी करणार पुतीन यांना फोन; भारत मध्यस्थ होणार?

युक्रेनच्या राजदूताने पीएम मोदींकडे मागितली मदत, म्हणाले- भारत एक जागतिक शक्तिशाली देश आहे, पुतीनला रोखण्यासाठी मदत करा..

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी भारत सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्याची विनंती केली आहे.

युक्रेनवर रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलण्याची विनंती केली आहे. यावेळी भारत हा एक शक्तिशाली जागतिक राष्ट्र बनला असून या मुद्द्यावर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भारत आणि रशियाचे चांगले संबंध आहेत, अशा परिस्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांचे नक्कीच ऐकतील याची आम्हाला खात्री आहे.

युक्रेनचे राजदूत डॉ.इगोर पोलिखा म्हणाले की, जगातील किती देश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी या मुद्द्यावर बोलत आहेत, हे मला माहीत नाही, मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना आता थांबायला सांगावे असे मला वाटते.

त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर बोलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!