दोन दिवसांआधी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह गोदापात्रात सापडला…

दोन दिवसांआधी घराबाहेर गेलेल्या एका 22 वर्षे वय असलेल्या पोलिसांना तरुणीचा अखेर मृतदेहच सापडला असून औरंगाबाद जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील बाबरगाव येथील रहिवासी असलेली एक तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता होती.

दिव्याच्या नातेवाईकांनी याबाबतची तक्रार गंगापूर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस त्या तरुणीच्या शोधात होते. अखेर काल रविवारी तिचा मृतदेह पोलिसांना जुने कायगाव टोका येथे गोदावरी नदीपात्रात आढळून आला. दिव्या अनिल दंडे असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या दंडे ही 9 जून 2022 पासून बेपत्ता होती. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी सकाळी तिचा मृतदेह औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जुना कायगाव टोका येथील गोदापात्रात तरंगताना नागरिकांना दिसल्यावर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सदरील घटनेची माहिती मिळताच क्षणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दिव्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. कुटुंबीयांच्या परवानगीने डॉक्टरांमार्फत तिचे शवविच्छेदन करण्यात आले.

दिव्याने आत्महत्या केली की, तिचा कोणी घातपात केला याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Similar Posts