स.म.लैं.गि.क नात्याने घेतले नवे वळण..! ‘तीने’ मैत्रिणीलाच म्हणले, माझ्याशी लग्न कर, नाहीतर…!
प्रेमात बुडालेल्या दोन समलिंगी मैत्रिणींचे ब्रेकअप झाले अन प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेल्याचा प्रकार औरंगाबाद शहरात घडला आहे.
दोघींचे वय साधारण २० ते २१ वर्षे, गेल्या ५ वर्षांपासून एकत्र रिलेशनशिपमध्ये राहत होते. आजपर्यंत अनेकदा स.म.लैं.गि.क संबंध स्थापित केल्यानंतर एक दिवस अचानक एक मैत्रिणीने दुसरी मैत्रिणीला ‘मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत लग्नाची गळ घातली, अन्यथा तुला जिवे मारून टाकीन’ अशी धमकी दिल्याने दुसरीने मदतीसाठी दामिनी पथक आणि नंतर क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून घेत दोघींकडून हमीपत्र लिहून देऊन प्रकरणावर पडदा टाकला आहे. दोघींचे कुटुंबासहित समुपदेशन करून एकमेकीं विरोधात काहीच तक्रार नसल्याचे लिहून घेत पोलिसांनी त्यांना कुटुंबीयांच्या हवाली केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सिमा आणि गौरी (नावे बदललेली आहेत) या वर्ग मैत्रिणी आहेत. सिमा ही काहीशी लाजरी तर गौरी मुलांप्रमाणे बिनधास्त वागणारी मुलगी आहे.
गौरीनेने पाच वर्षांपूर्वी सिमाला माझे तुझ्यावर प्रेम असून आपण सोबत राहू असे सांगितले. त्यानंतर दोघीही सोबत राहू लागल्या. दोघीही मुलीच असल्याने पालकांना यात काही गैर वाटले नाही.
नंतर मात्र गौरी मुलांप्रमाणे सिमावर हक्क बजावू लागली. यातच वर्षभरापूर्वी गौरीने सिमाला माझ्यासोबत पळून चल आपण लग्न करू, असे म्हणत दबाव टाकणे सुरु केले. पण समलिंगी नाते नकोसे झाल्याने आणि गौरीच्या वागण्यास कंटाळ्याने सिमाने ब्रेकअपचा निर्णय घेतला.
हा निर्णय गौरीला पटला नाही आणि तिने ब्रेकअप करण्यास नकार दिला आणि दोघींची काही छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्येची धमकी दिली. यामुळे सिमा घाबरली. तिने तिने थेट दामिनी पथकाच्या प्रमुख सुषमा पवार यांना संपर्क साधला. यानंतर सदरील प्रकरण क्रांती चौक पोलिसात गेले. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळत दोघींना पालकासह ठाण्यात बोलवले. त्यांनतर पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. दोघींनी समजुतीची भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी दोघींकडून कुटुंबासमोर हमीपत्र लिहून घेत सोडले.