भोंग्याच्या मुद्द्यावर मनसे ठाम; उद्या मशिदीवर भोंगा वाजला तर हनुमान चालीसा लावा; राज ठाकरेंनी मनसेसैनिकांना दिले आदेश..

राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्या मध्ये ते म्हणाले की, माझी विनंती आहे की उद्या म्हणजेच ४ मे रोजी लाऊडस्पीकरवर जिथे अजान दिली जाईल तिथे लाऊडस्पीकरवर तुम्ही हनुमान चालीसा लावा.

अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, मी देशातील सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की उद्या म्हणजेच ४ मे रोजी लाऊडस्पीकरवर जिथे अजान दिली जाईल, तिथे तुम्ही हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावा आणि लाऊडस्पीकरला काय अडचण आहे. त्यांनाही हे समजू द्या.

राज ठाकरे म्हणाले, “आम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की दिवंगत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षांपूर्वी लाऊडस्पीकर बंद करा, असे सांगितले होते, पण तुम्ही हे ऐकणार का?”

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक घेतली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ यांच्याशीही फोनवरून चर्चा केली.

Similar Posts