रासायनिक खतांच्या किंमती जाहीर, मात्र केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा..!

शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी..

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पावसाबरोबरच चिंता असते, ती बि-बियाणे अन् रासायनिक खतांच्या भावाची..! पीक जोरदार यावे, याकरीता रासायनिक खतांचा वापर करण्यात येतो.

खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना रासायनिक खतांची दरवाढ तर होणार नाही ना याची चिंता लागलेली असते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळे खताचे दरही वाढणारच हे मात्र नक्की..
पण, शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.

यावेळेस केंद्र सरकारने रासायनिक खताच्या अनुदान रकमेमध्ये मोठी वाढ केलीय. यावर्षी खतावर 60,939 कोटी रुपयांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे जाती रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली असली तरी त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावर होणार नाहीये.

निसर्गाच्या लहरी-पणामुळं पिकांचे मोठं नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू नाजूक आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने खतांच्या दरवाढीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये, याकरीता खबरदारी घेतली असून ‘आयएफसीओ’ (IFCO) ही सरकारी मालकीची कंपनी, खतांचे दर वाढू नयेत यासाठी दक्षता घेत आहे.

केंद्र सरकारने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या खतांच्या किमती…

Similar Posts