औरंगाबाद विद्यापीठात राडा, व्यवस्थापन परिषद सदस्याला काळे फासण्याचा प्रकार..
स्वतंत्र विद्यापीठाची मागणी लावून धरणारे व्यवस्थापन सदस्य संजय निंबळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये शाईफेक करत विद्यापीठ विभाजनास विरोध दाखविला.
उस्मानाबाद उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापिठात रुपांतर करावे अशी मागणी गेल्या काही काळापासून पुढे आली आहे. माजी कुलगुरू बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळामध्ये m व्यवस्थापन सदस्य संजय निंबाळकर यांनी हा ठराव मांडला होता. त्यानंतर सभेत ठराव पास होऊन पुढील कारवाईकरीता राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, आंबेडकरी संघटनांनी या ठरवास विरोध दर्शवत विद्यापीठाचे विभाजन म्हणजे नामांतर लढ्यातील बलिदानाचा अवमान ठरेल अशी भूमिका घेतली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी करून नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर ह्यांना काल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकी नंतर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम ह्यांनी निंबाळकर यांना काळे फासत जोरदार निषेध केला. ह्यावेळी गुणरत्न सोनवणे, पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार आंदोलन केले.
नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान करूम राज्यात दंगली पेटविण्याचे जातीयवादी षडयंत्र हणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारू प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे. संजय निंबाळकर सारख्या प्रवृत्तीना धडा शिकवून विभाजन हाणून पाडू.
–सचिन निकम, मराठवाडा अध्यक्ष
रिपब्लिकन विद्यार्थी सेना
मागणी जुनी आहे.
विद्यापीठाचे विभाजन करणे हे शासनाचे काम आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता यापुढेही मी माझे काम करत राहील. या प्रकरणाची तक्रार विद्यापीठ करेल.
– संजय निंबळकर, सदस्य, व्यवस्थापन परिषद