औरंगाबादेत होणार अग्नीवीरांची अग्निपथ योजने मार्फत सैन्य भरती…
औरंगाबाद मध्ये अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून ही रॅली 13 ऑगस्ट 2022 ते 8 सप्टेंबर 2022 रोजी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच ही रॅली औरंगाबाद, जालना, जळगाव, बुलढाणा, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकरिता सुद्धा राहणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली अधिसूचना डाऊनलोड करून जाहिरात बघावी
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● सहभागी जिल्हे :- औरंगाबाद, जालना, हिंगोली, बुलडाणा, जळगाव, नांदेड आणि परभणी.
꧁ पदाचे नाव ꧂
1) अग्निवीर जनरल ड्यूटी Agniveer General Duty (All Arms)
2) अग्निवीर टेक्निकल Agniveer (Tech) (All Arms)
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल Agniveer Clerk / Store Keeper Technical (All Arms)
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास Agniveer Tradesmen (All Arms)
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास Agniveer Tradesmen (All Arms)
꧁ वेतन, भत्ते आणि संबंधित लाभ ꧂
(a) अग्निवीर पॅकेज
(i) अग्निवीरांचे वेतन व मानधन खालीलप्रमाणे असेल:-
• वर्ष 1. सानुकूलित पॅकेज – रु 30,000/- (अधिक लागू भत्ते)
• वर्ष 2. सानुकूलित पॅकेज – रु. 33,000/- (अधिक लागू भत्ते)
• वर्ष 3. सानुकूलित पॅकेज – रु 36,500/- (अधिक लागू भत्ते)
• वर्ष 4. सानुकूलित पॅकेज – रु 40,000/- (अधिक लागू भत्ते)
꧁ शैक्षणिक पात्रता ꧂
1) अग्निवीर जनरल ड्यूटी – किमान 45% गुणांसह 10वी पास तसेच (प्रत्येक विषयात 33% गुणांसह पास असणे आवश्यक) सूचना –हलके चारचाकी वाहन चालनचा वैध परवाना (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या उमेदवारांना ड्रायव्हरसाठी प्राधान्य दिले जाईल.
2) अग्निवीर टेक्निकल – किमान 50% गुणांसह 12 वी पास असणे आवश्यक. (विज्ञान – PCM & E गृप) आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – किमान 60% गुणांसह 12वी पास असणे आवश्यक. (कला, वाणिज्य, विज्ञान) आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण. इयत्ता 12वी मध्य किमान 50% गुण (इंग्रजी आणि गणित/अकाउंट/बूक किपिंग)
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास – 10वी पास असणे आवश्यक.( प्रत्येक विषयात किमान 33% गुण आवश्यक)
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास – 08वी पास, प्रत्येक विषयामध्ये किमान 33% गुण असणे आवश्यक)
● वयोमर्यादा :- 17½-23 वर्ष (इच्छुक उमेदवारांचा जन्म दि 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यानचा असावा)
꧁ शारीरिक पात्रता ꧂
● उंची (Hight) –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी – 168 से.मी.
2) अग्निवीर टेक्निकल – 167 से.मी.
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – 162 से.मी.
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास – 168 से.मी.
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास – 168 से.मी.
● वजन –
आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
● छाती –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी / अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – 77 से.मी + 5 से.मी
2) अग्निवीर ट्रेड्समन / अग्निवीर टेक्निकल – 76 से.मी + 5 से.मी
꧁ महत्त्वाची कागदपत्रे – औरंगाबाद आर्मी भारती 2022 ꧂10वी उत्तीर्ण मार्क्स
12वी उत्तीर्ण मार्क्सशीट आधार कार्ड
शिक्षण प्रमाणपत्र
सैन्य संबंध प्रमाणपत्र
अविवाहित प्रमाणपत्र
जातीचा दाखला
अधिवास प्रमाणपत्र
क्रीडा प्रमाणपत्र
एनसीसी प्रमाणपत्र
डीओबी (जन्माचे) प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
● फी :- फी नाही
● अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
● रॅलीचा कालावधी :- 13 ऑगस्ट 2022 ते 08 सप्टेंबर 2022
● भरती मेळाव्याचे ठिकाण :- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्टेडियम, औरंगाबाद
● अर्ज अंतिम दिनांक :- 30 जुलै 2022
● अर्ज लिंक – http://joinindianarmy.nic.in

नोंदणी केलेल्या उमेदवारांना 7 ऑगस्ट 2022 ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये प्रवेशपत्र मिळणार असून या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात येणार आहे, त्याकरिता उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला व दलालांना बळी पडु नये, असे आवाहन आर्मी विभागाने केले आहे.