औरंगाबादेत होणार अग्नीवीरांची अग्निपथ योजने मार्फत सैन्य भरती…

औरंगाबाद मध्ये अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून ही रॅली 13 ऑगस्ट 2022 ते 8 सप्टेंबर 2022 रोजी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच ही रॅली औरंगाबाद, जालना, जळगाव, बुलढाणा, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकरिता सुद्धा राहणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली अधिसूचना डाऊनलोड करून जाहिरात बघावी

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

सहभागी जिल्हे :- औरंगाबाद, जालना, हिंगोली, बुलडाणा, जळगाव, नांदेड आणि परभणी.

पदाचे नाव
1) अग्निवीर जनरल ड्यूटी Agniveer General Duty (All Arms)
2) अग्निवीर टेक्निकल Agniveer (Tech) (All Arms)
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल Agniveer Clerk / Store Keeper Technical (All Arms)
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास Agniveer Tradesmen (All Arms)
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास Agniveer Tradesmen (All Arms)

꧁ वेतन, भत्ते आणि संबंधित लाभ ꧂
(a) अग्निवीर पॅकेज

(i) अग्निवीरांचे वेतन व मानधन खालीलप्रमाणे असेल:-

• वर्ष 1. सानुकूलित पॅकेज – रु 30,000/- (अधिक लागू भत्ते)
• वर्ष 2. सानुकूलित पॅकेज – रु. 33,000/- (अधिक लागू भत्ते)
• वर्ष 3. सानुकूलित पॅकेज – रु 36,500/- (अधिक लागू भत्ते)
• वर्ष 4. सानुकूलित पॅकेज – रु 40,000/- (अधिक लागू भत्ते)

꧁ शैक्षणिक पात्रता ꧂

1) अग्निवीर जनरल ड्यूटी – किमान 45% गुणांसह 10वी पास तसेच (प्रत्येक विषयात 33% गुणांसह पास असणे आवश्यक) सूचना –हलके चारचाकी वाहन चालनचा वैध परवाना (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या उमेदवारांना ड्रायव्हरसाठी प्राधान्य दिले जाईल.
2) अग्निवीर टेक्निकल – किमान 50% गुणांसह 12 वी पास असणे आवश्यक. (विज्ञान – PCM & E गृप) आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – किमान 60% गुणांसह 12वी पास असणे आवश्यक. (कला, वाणिज्य, विज्ञान) आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण. इयत्ता 12वी मध्य किमान 50% गुण (इंग्रजी आणि गणित/अकाउंट/बूक किपिंग)
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास – 10वी पास असणे आवश्यक.( प्रत्येक विषयात किमान 33% गुण आवश्यक)
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास – 08वी पास, प्रत्येक विषयामध्ये किमान 33% गुण असणे आवश्यक)

वयोमर्यादा :- 17½-23 वर्ष (इच्छुक उमेदवारांचा जन्म दि 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यानचा असावा)

꧁ शारीरिक पात्रता ꧂

उंची (Hight) –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी – 168 से.मी.
2) अग्निवीर टेक्निकल – 167 से.मी.
3) अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – 162 से.मी.
4) अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास – 168 से.मी.
5) अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास – 168 से.मी.

वजन –
आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात

छाती –
1) अग्निवीर जनरल ड्यूटी / अग्निवीर क्लर्क/ स्टोर कीपर टेक्निकल – 77 से.मी + 5 से.मी
2) अग्निवीर ट्रेड्समन / अग्निवीर टेक्निकल – 76 से.मी + 5 से.मी

꧁ महत्त्वाची कागदपत्रे – औरंगाबाद आर्मी भारती 2022 ꧂
▪️10वी उत्तीर्ण मार्क्स
▪️12वी उत्तीर्ण मार्क्सशीट आधार कार्ड
▪️शिक्षण प्रमाणपत्र
▪️सैन्य संबंध प्रमाणपत्र
▪️अविवाहित प्रमाणपत्र
▪️जातीचा दाखला
▪️अधिवास प्रमाणपत्र
▪️क्रीडा प्रमाणपत्र
▪️एनसीसी प्रमाणपत्र
▪️डीओबी (जन्माचे) प्रमाणपत्र
▪️पासपोर्ट आकाराचा फोटो

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

रॅलीचा कालावधी :- 13 ऑगस्ट 2022 ते 08 सप्टेंबर 2022

भरती मेळाव्याचे ठिकाण :- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्टेडियम, औरंगाबाद

अर्ज अंतिम दिनांक :- 30 जुलै 2022

अर्ज लिंकhttp://joinindianarmy.nic.in

नोंदणी केलेल्या उमेदवारांना 7 ऑगस्ट 2022 ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये प्रवेशपत्र मिळणार असून या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात येणार आहे, त्याकरिता उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला व दलालांना बळी पडु नये, असे आवाहन आर्मी विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!