Tractor Scheme| खुशखबर! दसऱ्यापासून राज्यात सुरु झाली अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना; 15 लाखांपर्यंत लाभ ‘असा’ घ्या.
Tractor Scheme | मराठा समाजामधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत निरनिराळ्या योजना राबविण्यात येतात. या योजनातील ट्रॅक्टर (Tractor Scheme) खरेदी योजनेसाठीची मर्यादेत वाढ करून आता 15 लाख रुपयांपर्यंत एवढी करण्यात आलेली आहे. शिवाय, या योजनेअंतर्गत दसऱ्यापासून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर सवलत मिळणे सुरू झाली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी याबाबतची माहिती देतातांना सांगितले की, महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज personal loan परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदीची प्रकरणे परत सुरु करण्याची कार्यवाही करण्यात आलेली असून दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात झालेली आहे. याकरिता महिंद्रा आणि एस्कॉट टर्बो या दोन कंपन्याबरोबर सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आलेला आहे. (Tractor Scheme)
ट्रॅक्टरच्या मूळ किमतीच्या 50 टक्के व्याज परतावा (Tractor Scheme)
ट्रॅक्टर खरेदी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर किमतीच्या 50 टक्के एवढा व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक असून त्याचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे, शिवाय त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे नसावे. लाभार्थ्याने किमान 10वी पास केलेली असावी, आणि त्याच्याकडे किमान 10,000 रुपयांचे स्वयंरोजगाराचे प्रकल्प असणे गरजेचे आहे.
राज्यामध्ये महामंडळाच्या ट्रॅक्टर योजनांची जनजागृती गावपातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हानिहाय दौरे आणि मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलेले असून राज्यामधील विविध तालुक्यांत या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार आणि प्रसिध्दी करण्यात येत आहे.
वैयक्तिक कर्ज personal loan व्याज परतावा योजना
लाभार्थ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने महामंडळाच्या योजनांत काही बदल करण्यात आलेले असून यांत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत (IR-1) कर्ज मर्यादेत 10 लाखांवरुन 15 लाखांपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. यासोबतच 3 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याच्या मर्यादा 4.5 लाख रुपयांपर्यंत एवढी वाढवून कर्जाचा कालावधीत 5 वर्षां हून 7 वर्षापर्यंत वाढ करण्यात आला आहे. महामंडळाच्या या योजनेअंतर्गत सर्वांसाठी वयोमर्यादेची अट 60 वर्षापर्यंत एवढी वाढविण्यात आलेली आहे. (Tractor Scheme)
अण्णासाहेब पाटील योजनेचा GR डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा .
भविष्यामध्ये महामंडळाच्या माध्यमामधून जास्तीत जास्त संख्येने मराठा तरुणांना उद्योजक म्हणून तयार करण्याचे ध्येय असल्याचे देखील श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे मराठा तरुणांना शेती पूरक व्यवसायाकरिता ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळून. त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास नक्कीच मदत होईल.