गूगल मॅपवर औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचं ‘धाराशिव’ असा उल्लेख..


aurangabad-renamed-sambhajinagar-on-google-maps/ औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण गरम असतानाच आता गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर‘ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव‘ असा उल्लेख करण्यात आला आहे. गुगल मॅपवर औरंगाबाद सर्च केल्यावर मराठीत औरंगाबाद आणि इंग्रजीत ‘संभाजीनगर‘, तसेच उस्मानाबाद सर्च केल्यावर मराठीत उस्मानाबाद आणि इंग्रजीत ‘धाराशिव‘ असे दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून नाव बदलाच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच आता गुगलने औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर‘ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव‘ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद नामांतराचा मुद्दा गेल्या 34 वर्षांपासून चर्चेत आहे. या काळात अनेक आंदोलने झाली, प्रकरण न्यायालयात गेले, इतक्या दिवसांच्या संघर्षानंतर अखेर राज्य सरकारने नाव बदलाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यानंतरही नाव बदलाला विरोध सुरूच आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. मात्र त्यापूर्वी गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर‘ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबाद विधानसभेत शहराचे नाव संभाजीनगर असा प्रथम उल्लेख केला होता. तेव्हापासून शिवसेनेकडून शहराचा संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. शासकीय कार्यक्रमात अनेकवेळा शिवसेनेचा मंत्र संभाजीनगर असा उल्लेख केल्याचेही समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!