सावधान..! गुजरात टायटनच्या विजयावर ५९९ मोफत रिचार्ज? लिंक वर क्लिक केल्यास बँक खाते होऊ शकते रिकामे…

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL २०२२ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय नोंदवला. मात्र, गुजरात टायटन्सच्या विजयानंतर काही सायबर माफिया या संधीचा फायदा घेऊन तुमचा बँक खाते रिकामे करू शकतात.

काय आहे व्हायरल मॅसेज

कृपया कोणीही अश्या फेक लिंकवर क्लिक करू नये..

आम्ही तुम्हाला सांगतो की या संदर्भात TATA कडून कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही, तसेच TATA IPL फ्री रिचार्ज ऑफर कोणत्याही वापरकर्त्यांना दिली जाईल असे सांगितले गेले नाही. फ्री रिचार्जच्या बहाण्याने लोकांची खाती रिकामी केली जात आहेत,

जर तुमच्याकडेही “TATA IPL ऑफर” असेल तर फायनल जिंकल्याच्या आनंदात टाटा गुजरात टायटन्सला 3 महिन्यांचे 599 चे रिचार्ज मोफत देण्याचे आश्वासन देत आहे तर हा संदेश येत आहे, तर तुम्ही सावध रहा आणि वरील लिंकवर अजिबात क्लिक करू नका, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो, त्यानंतर तुमचे बँक खाते रिकामे होईल. म्हणूनच तुम्ही सावध राहा, सतर्क राहा आणि तुमच्या नातेवाईकांनाही सतर्क करा, जेणेकरून त्यांची फसवणूक टाळता येईल.

आणि एकदा या लिंक वर क्लिक केली तर तुमच्या व्हॉट्सॲप हॅक होऊन तुमच्या contact list मधील परिजनांना

असा व अश्लील मेसेज सेंड करून तुमची बदनामी केली जाते.. त्यामुळे कृपया विनंती की हा मेसेज पुढे सेंड न करता delete करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!