Bal Sangopan Yojana in Marathi शिंदे सरकारची नवीन योजना लहान मुलांना मिळणार दर महिन्याला 1100 रुपये

Bal Sangopan Yojana
Bal Sangopan Yojana

Bal Sangopan Yojana: राज्य व केंद्र सरकार सर्व घटकांसाठी योजना राबवते. तसेच लहान मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना सुरू केली. ‘बाल संगोपन योजना’ (Government Scheme) असं या योजनेचं नाव.. या योजनेमुळे लहान मुलांना दरमहा आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.

Government New Scheme ही योजना लहान मुलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. आपल्या राज्यातील लहान मुलांचे आरोग्य व त्यांचे राहणीमान करिता महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.

बालसंगोपन योजना ही केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे परंतु ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या निधीतून राबवली जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लहान मुलांना 1100 रुपये दिले जातात. Bal Sangopan Yojana in Marathi

बाल संगोपन योजना


बाल संगोपन योजनेचा लाभ 18 हजार पेक्षा अधिक मुले घेत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बालकांना दरमहा 1100 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश लहान मुलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे हा आहे. Bal Sangopan Yojana Maharashtra Online Apply

bal sangopan yojana maharashtra in marathi gr या योजनेचा लाभ 0 ते 18 वर्षांखालील मुले घेऊ शकतात. या मुलांना दर महिन्याला 1100 रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग मार्फत राबविली जाते.

एखाद्या बालकाचे आई वडील एखाद्या कारणामुळे मृत्युमुखी पडतात वा बालक अनाथ झाल्यामुळे अशा परिस्थितीत बालकांना या योजनेअंतर्गत त्यांना 18 वर्षापर्यंत पालन, पोषण, शिक्षणासाठी दरमहा 1100 रुपये दिले जाते. bal sangopan yojana form pdf

या योजनेचा लाभ इतर मुलांना देखील मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, यासाठी काही आवश्यक कागदपत्रे देखील लागतात. Bal Sangopan Yojana Form

आवश्यक कागदपत्रे
अर्जाचा नमुना (ऑफलाईन अर्जासाठी)
आधार कार्ड झेरॉक्स मुलाची आणि वडिलाची
शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट
उत्पन्नाचा दाखला (तलाठ्याचा)
पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र (मृत्युचा दाखला)
पालकाचा रहिवासी दाखला
मुलाचे बॅंक पासबुक झेरॉक्स
घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो
मुलाचे दोन पासपोर्ट साईज फोटो
पालकाचा पासपोर्ट फोटो

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्हा कार्यालयात जावून अर्ज घेऊन, अर्जामध्ये विचारलेली माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावा.

Bal Sangopan Yojana Online Apply या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://womenchild.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जा.

या योजनेचा लाभ कोणत्या मुलांना घेता येईल ते खालीलप्रमाणे दिले आहे.
या योजनेचा लाभ वय 0 ते 18 वर्षांखालील मुलांना मिळणार आहे.
ही योजना अनाथ बालकांसाठी राबविण्यात येते ज्या बालकांचे पालक काही कारणामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके.
एखाद्या बालकाला कुष्ठरोग झाला असेल.
जे बालक एखाद्या गुन्ह्यांतर्गत कारावासात असेल.
एखादे परिवार आपल्या मुलाला सांभाळायला असमर्थ असतील. Bal Sangopan Yojana in Marathi
अविवाहित माता या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकेल.
मतिमंद, अपंग मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ज्या बालकांचे आई वडील एखाद्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती आहेत.
ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत.
अशी बालके ज्यांचे आई वडील घटस्फोटित आहेत.
दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ज्या बालकांच्या आई वडिलांना एड्स झाला आहे.
ज्या बालकांना एड्स झाला आहे.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!