Life Certificate : ‘हयातीचा दाखला’ घेण्याकरिता बँक कर्मचारीच येणार घरी; केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय!
Life Certificate : केंद्रातील मोदी सरकारने पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले असून या निर्देशाअंतर्गत अंथरुणाला खिळून किंवा रुग्णालयात भरती असलेल्या पेन्शन धारकांचे लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला आता बँक कर्मचारी स्वतः जाऊन कलेक्ट करणार असल्यामुळे लाखो पेंशन धारकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्राच्या पेंशन आणि पेंशन धारक कल्याण विभागाने (DOPPW) याबाबतचा आदेश दिलेला आहे. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सुपर-सीनियर पेंशनर्सना डिजिटल माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हायातीचा दाखला बनवण्यास मदत करून याबाबत जागरुकता सुद्धा निर्माण करावी असंही बँकांना बजावण्यात आलं आहे.
Life Certificate म्हणजे काय?
पेंशन मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दर वर्षी ते जिवंत असल्याचा पुरावा बँकेला देणे आवश्यक असते. यासाठी दर वर्षी हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट बँकेत जमा करावं लागतं. जर हा दाखला जमा केला नाही, तर त्या व्यक्तीची पेंशन बंद होऊ शकते.
कित्येक पेंशनधारक वयोवृद्ध व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमुळे अंथरुणाला तर कित्येक रुग्णालयांमध्ये भरती असतात. अशा वेळी त्यांच्या हयातीचा दाखला बँकेत जाऊन देणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा मिळणार आहे. सद्य स्थितीत केंद्र सरकार सुमारे 69.76 लाख लोकांना पेन्शन देते\
घरबसल्या सुद्धा करता येईल जमा
DOPPW विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, पेन्शनधारक व्यक्ती घरबसल्या सुद्धा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच त्यांच्या हायतीचा दाखला जमा करू शकणार आहे. याकरिता फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असल्यामुळे मोबाईलचे मदतीने सुद्धा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला भरता येऊ शकेल.
केंद्राने 2019 साली दिलेल्या आदेशाप्रमाणे, 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सुपर सीनियर व्यक्ती हे या ऑक्टोबर महिन्यापासून आपला life certificate हयातीचा दाखला जमा करू शकतात. तर, त्याहून कमी वयाचे व्यक्ती येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यापासून आपलं लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतील.
त्यामुळे आता बँका ऑक्टोबर महिन्यापासून सुपर-सीनियर पेन्शनर्सचा हयातीचा दाखला कलेक्ट करण्यासाठी या ऑक्टोबर महिन्यापासून मोहीम राबवण्याची शक्यता आहे.
सरकार देत आहे सोलार वर भरघोस अनुदान; अधिक माहितीसाठी क्लिक करा