zp recruitment maharashtra

ZP Recruitment 2023 Maharashtra: जिल्हा परिषद मोठी नोकरभरती, असा करा अर्ज

zp recruitment maharashtra
zp recruitment maharashtra

ZP Recruitment 2023 Maharashtra: जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गट क विभागातील भरती करण्यास शिंदे सरकारने मान्यता दिली आहे. वाहन चालक व गट ड विभागातील पदे वगळून इतर एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के जागा राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

राज्यात 75 हजार जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यात ग्रामविकास विभागातील ही नोकर भरती महत्त्वाची आहे. जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेअंतर्गत गट क विभागासाठी नोकर भरती केल्या जाणार आहे.

जिल्हा परिषद गट क भरती अशी होणार
सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास सरकारने मुभा दिली आहे. त्यानुसार विविध विभागात नोकर भरती सुरू झाली आहे. यामुळे राज्यात नोकऱ्यांचा महापूर येणार आहे.

गट अ, ब आणि क मधील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत भरतीस मंजुरी दिली आहे. यामध्ये वाहनचालक व गट ‘ड’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली नाही. ZP Bharti 2022 Maharashtra

सध्या राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुमारे 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ZP Recruitment अधिक वय झालेल्यांना या भरतीमध्ये सूट मिळणार आहे. कारण ही रखडलेली नोकर भरती आहे. मार्च, 2019 च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत. Zilha Parishad Bharti 2022

या भरतीमध्ये वयाची अटींमध्ये अनेक अर्जदार बसत नाही. असे अर्जदार परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, यासाठी अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे.

राज्यात नोकऱ्यांचा महापूर येणार आहे. राज्यातील अनेक विभागात रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत गट क विभागाची नोकर भरती लवकरच केल्या जाणार आहे. ही माहिती राज्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची आहे. त्यासाठी आपण ही माहिती अवश्य शेअर करा.


हे देखील वाचा –


Similar Posts