Spam Call Blocker | आता स्पॅम कॉल आला की ओळखता येणार, मोदी सरकारची खास सेवा

Spam Call Blocker
Spam Call Blocker

Spam Call Blocker: आत्ताच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आता समोर येताना दिसत आहेत. मोबाईलचे काहींना अगदी व्यसन लागले आहे, तर सायबर चोरांनी याच मोबाईलच्या साहाय्याने नागरिकांना लुटण्याचा धंदा सुरु केला आहे.

मोबाईलचे महत्वाचे काम म्हणजे, एकमेकांशी संवाद साधता येणे होय. दिवसभरात अनेक काॅल येत असतात. काही कामाचे असतात, तर कधी कधी फेक काॅल देखील येतात. राॅंग नंबर बोलून आपण ते कट करतो. परंतु, काहींना हाच एक धंदा लागला आहे. spam blocker

ओळखीचा असो किंवा नसो त्यांचे काॅल सुरुच असतात. यामुळे समोरची व्यक्ती वैतागून जाते. समोरची व्यक्ती वैतागल्यानंतर असे नंबर ब्लाॅक करते, किंवा फारच त्रास झाल्यात सायबर पोलिसांत तक्रार करते. असे स्पॅम कॉल येण्याचे दिवसेंदिवस वाढत आहे. Block Spam Calls

स्पॅम कॉलच्या माध्यमातून अनेकदा काही लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. मात्र, आता नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. कारण, मोदी सरकारने आता त्यावर तोडगा काढला आहे. यामुळे स्पॅम कॉल रोखणं 100 टक्के शक्य होणार आहे. Spam Call App

ट्रू कॉलर (Truecaller) ॲप सर्वांनाच माहित असेल आणि आपण वापर देखील करत असाल.. ट्रू कॉलर ॲपद्वारे अनोळखी नंबरवरुन येणारा काॅल कोणाचा आहे, हे जाणून घेता येते. परंतु, ट्रू कॉलर ॲपवर मिळणारी माहिती खरीचं असेल, याची खात्री नाही. (Spam Call Block)

मोबाईल युजर्सची सुरक्षा व अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून त्यांची सुटका मिळावी यासाठी मोदी सरकारने खास तोडगा काढला आहे. ज्यामुळे अनोळखी नंबरवरून काॅल आला तर फोन करणाऱ्याचे नाव तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतंही ॲप डाऊनलोड करायची गरज नाहीये. block spam calls iphone

मोदी सरकारची खास सेवा..
‘ट्राय’ने (TRAI) आत्ताच एक नवीन नियम सुरू केला आहे. या नियमानुसार, आता नवीन सिम कार्ड घेताना, केवायसी फॉर्मवर ग्राहकाला त्याची स्वतःची खरी माहिती भरावी लागणार आहे. फॉर्मवर जे खरं नाव टाकलेले असेल तेच नाव कॉल केल्यानंतर पुढील व्यक्तीला दिसेल.

‘ट्राय’कडून केवायसी आधारित ही सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेमुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सुटका मिळणार आहे.‌ नागरिकांना या सेवेमुळे 100 टक्के खरी माहिती मिळेल. हा महत्वाचा देशातील नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!