औरंगाबाद-जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

भरधाव वेगाने एक पिकअप जीप ( MH 21 BH 4331) जालन्याहून औरंगाबादकडे येत होती. जालना रोडवर असलेल्या जवळगाव फाट्यावर पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्यामुले पिकअप दुभाजकावर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली.

याच वेळेस जालन्याला जाणारी पुणे-कळमनुरी बस आली. आणि पिकअप बसवर आदळली. या अपघातात 4 जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे. हा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी लगेच अपघातस्थळ गाठून बचावकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. झालेल्या या अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक प्रभावित झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!