शुगरच्या रूग्णांनी आवश्य खावी ‘ही’ भाजी, लगेच कंट्रोल होईल Blood Sugar Level..

उन्हाळ्यामध्ये अशा अनेक भाज्या असतात ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यापैकी एक म्हणजे तोंडलीची भाजी. तोंडलीच्या भाजीला पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. विशेषतः डायबेटिसच्या रुग्णांनी तोंडलीची भाजी आवश्य खावी. तोंडलीची भाजी खायला खूप चविष्ट लागते.

हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांकरीता टोंडलीची भाजी खूप फायदेशीर मानली जाते. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तर तोंडलीचा आहारात नक्की समावेश करा. तोंडलीचे फायदे जाणून घ्या.

तोंडलीमध्ये अनेक पोषक घटक व अनेक जीवनसत्त्वे आढळतात जे की आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तोंडलीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात.

तोंडलीचे फायदे

1- मधुमेहावर नियंत्रण
मधुमेहाच्या

रुग्णाला अतिशय जपून खावे लागते. आहारातील गडबडीमुळे रक्तातील शुगर लगेच वाढू लागते. अशावेळी मधुमेहाच्या रुग्णाने तोंडलीचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. तोंडलीमध्ये अँटी-हायपरग्लाइसेमिकचा प्रभाव असतो, जो रक्तामधील साखरेची वाढलेली पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो

2- लठ्ठपणा कमी करते. –

तोंडली ही फायबरने समृद्ध असलेली भाजी आहे. ते खाल्ल्यामुळे वजन सहज नियंत्रित करता येते. तोंडली खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरलेले राहते. जर तुम्ही डाएटवर असाल तर तोंडली तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.

3- इम्युनिटी वाढवते

तोंडलीमध्ये खूप जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपली इम्युनिटी मजबूत होते. तोंडलीच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.

4- हृदयाला निरोगी बनवते

तोंडलीमध्ये अशी बरीच पोषकतत्व असतात जी हृदयाशी संबंधित समस्येला दूर करतात. तोंडलीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळतात, जे अँटी-इम्ल्फेमेटेरी आणि अँटि-ऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असतात.
जे तुमचे हृदय निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत करतात. तोंडली हृदयाच्या समस्या वाढवणारे फ्री-रॅडिकल्स देखील कमी करते.

5- संसर्ग दूर ठेवते

तोंडलीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे संसर्गापासून वाचवतात.शिवाय तोंडलीमध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B खूप चांगल्या प्रमाणात आढळते. जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.


(Disclaimer : कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!