बँक ऑफ बडोदामध्ये खाते असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 ऑगस्टपासून हा नियम होणार लागू…

Bank Of Barod Positive Pay System: बँक ऑफ बडोदा १ ऑगस्टपासून आपल्या ग्राहकांसाठी चेक क्लिअरन्सचे नियम बदलणार आहे. बँकेने 1 ऑगस्टपासून ग्राहकांसाठी 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशांसाठी सकारात्मक वेतन प्रणाली अनिवार्य केली आहे.

जर तुमचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदाने 1 ऑगस्टपासून चेक व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली असून RBIच्या निर्देशांनंतर बँक ऑफ बडोदाने चेक व्यवहाराच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून 1 ऑगस्टपासून चेक पेमेंटच्या नियमात बदल होणार आहे.

1 ऑगस्ट 2022 पासून 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉजिटिव पे सिस्टम (PPS) अनिवार्य असेल. अन्यथा या पॉजिटिव पे सिस्टम अभावी पेमेंट केले जाणार नाही. म्हणजेच 1 ऑगस्ट 2022 पासून बँकांना ग्राहकांना चेक देण्यापूर्वी चेकची माहिती द्यावी लागणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या ( BOB) ग्राहकांना 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक दिलेला असल्यास त्याचा तपशील बँकेला द्यावा लागेल. बँकेला चेक क्लिअरन्स करण्यापूर्वी त्याचे क्रॉस व्हेरिफाय करने आवश्यक राहील. बँकेने योग्य ती पडताळणी केल्यानंतरच चेकचे पेमेंट करता येईल. चेक पडताळणीच्या दरम्यान सर्व माहिती दिलेली नसल्यास, बँक तो चेक क्लिअर करणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन आदेशानुसार, तुम्ही एखाद्याला चेक दिल्यावर, तुम्हाला एसएमएस (SMS), इंटरनेट बँकिंग Internet Banking), एटीएम(ATM) किंवा मोबाइल बँकिंगद्वारे (Mobile banking) चेकची आणि लाभार्थ्याची पूर्ण माहिती बँकेला देणे आवश्यक असेल. तुम्हाला लाभार्थ्याचे नाव, त्याचे खाते क्रमांक,किती रक्कम, चेक क्रमांक यासारखी आवश्यक माहिती बँकेला द्यावीच लागेल. या शिवाय पेमेंट करण्यापूर्वी बँक तुम्हाला याबद्दल कन्फर्मेंशन विचारेल. तुम्ही कन्फर्मेंशन दिल्यावरच बँक चेक क्लिअर करेल.

बँक ऑफ बडोदाने (BOB) ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही तुमच्या बँकिंग सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. पॉजिटिव पे सिस्टम(PPS), चेक फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करतो. 1 ऑगस्ट 2022 पासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेसाठी पॉजिटिव पे सिस्टम (PPS), अनिवार्य असेल.

जाणून घ्या काय आहेत RBI ची मार्गदर्शक तत्वे?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 50 हजार आणि त्याहून जास्त रकमेच्या चेककरीता पॉजिटिव पे सिस्टमची(PPS) ची सुविधा प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. तर सेंट्रल बँकेने 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या धनादेशावर पॉजिटिव पे सिस्टमची(PPS) अनिवार्य करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!