फेरफार उतारा, नकाशा, 7/12, 8अ उतारा अशा 17 सुविधा व सर्व कागदपत्रे आता एका क्लिकवर! भूमी अभिलेख विभागाचे नवे डिजिटल पोर्टल: Bhumi Abhilekh online nakasha

Bhumi Abhilekh online nakasha : तुम्ही जर शेतकरी असाल तर शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी तुम्हाला आता वारंवार भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागणार नाही. राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचे एक नवीन पोर्टल अपडेट केले असून, त्या पोर्टलच्या सहाय्याने तुम्हाला आता घरबसल्या तब्बल 17 वेगवेगळ्या सेवांचा लाभ मिळणार आहेत. यामुळे तुमचा वेळ आणि श्रम तर वाचणारच आहे शिवाय पैश्यांची सुद्धा बचत होणार आहे. चला तर मग, या सर्व नवीन सुविधांची माहिती घेऊया.

भूमी अभिलेख म्हणजे काय?

जमिनीच्या नोंदी, मालकी हक्क, किंवा इतर कागदपत्रांच्या नोंदी करण्यासाठी सरकारने जे कार्यालय सुरू केले आहे, त्याला *भूमी अभिलेख विभाग* कार्यालय असे म्हणतात. भूमी अभिलेख हा विभाग शेत जमिनी संबंधित सर्व कागदपत्रांच्या सुसूत्रतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी या कागदपत्रांसाठी तुम्हाला जिल्ह्याच्या कार्यालयात जावे लागायचे, पण आता हे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे.

डिजिटल भूमी अभिलेख पोर्टलची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासनाने bhumiabhilekh.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर नागरिकांना आवश्यक असलेल्या 17 सुविधांचा समावेश केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना मात्र  15 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यामुळे अनेक कागदपत्रे आणि प्रक्रियेसाठी आता कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.

कोणत्या आहेत त्या 17 सुविधा?

1. 7/12 उतारा डिजिटल स्वाक्षरीसह
2. 7/12 फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज
3. फेरफार स्थिती तपासणी
4. फेरफार उतारा
5. 8अ उतारा डिजिटल स्वाक्षरीसह
6. मालमत्ता पत्रक आणि त्याचे फेरफार
7. अधिकार क्षेत्र तपासणी

8. प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणांची माहिती
9. ई-अभिलेख सेवा
10. ई-नकाशा/भू-नकाशा
11. आपली चावडी माहिती
12. इ-मोजणी अर्ज
13. अभिलेख पडताळणी सेवा
14. ई-चावडी जमीन महसूल भरणा 
15. ई-कोर्ट प्रकरणे तपासणी
16. ई-पीक पाहणी सेवा
17. वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज

Bhumi Abhilekh online nakasha पोर्टलचे फायदे

1. घरबसल्या सेवा– शेतकरी व नागरिकांना आता कार्यालयीन कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. 
2. वेळेची बचत – ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्याने तुमची कामे जलदगतीने होतात. 
3. सोयीस्कर प्रक्रिया – डिजिटल दस्तऐवजांमुळे फिजिकल कागदपत्रे साठवण्याची गरज उरत नाही. 
4. कमी खर्च – फक्त 15 रुपये शुल्क भरून तुम्ही ही सेवा घेऊ शकता. 

भारतातील भूमी अभिलेखांचे प्रमुख प्रकार

1. जमिनीची नोंद: जमिनीचा प्रकार, स्थान, आणि आकारासंदर्भातील मूलभूत माहिती. 
2. हक्कांची नोंद (RoR): मालक, भाडेकरू, गहाणखत यांचे तपशील. 
3. उत्परिवर्तन नोंदवही: मालकी बदलाची माहिती. 
4. भाडेकरार व पीक नोंदी: शेतीच्या व्यवस्थेसंबंधित नोंदी. 
5. विवादित प्रकरणांची नोंद: कायदेशीर विवादांची माहिती. 
6. सर्वेक्षण आणि सेटलमेंट रेकॉर्ड: जमिनीचे नकाशे व सीमा तपशील. 
7. जमीन सुधारणा नोंदी: सिंचन किंवा इतर सुधारणा नोंदी. 

भूमी अभिलेख विभागाचे नवे पोर्टल” हे डिजिटल युगातील एक मोठे पाऊल आहे. शेतकरी आणि नागरिकांसाठी हे पोर्टल काम सोपे व जलद करते. यामुळे केवळ वेळच वाचणार नाही तर व्यवहारही पारदर्शक होतील. 

तुमच्या कागदपत्रांच्या गरजांसाठी एकदा  https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या पोर्टलला भेट द्या आणि या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घ्या!

Similar Posts