क्रेटा आणि वेन्यूला टक्कर द्यायला येतेय Tata Blackbird SUV, नेक्सॉनपेक्षाही असतील जबरदस्त फीचर्स.

टाटा मोटर्स एक कार निर्माता ब्रँड म्हणून भारतातील ग्राहकांचे मन जिंकत आहे. कंपनी लागोपाठ नवीन मॉडल्स भारतात केवळ लॉन्च करत नाही तर त्यांचे वेगवेगळे व्हेरियंट्स सुद्धा आणत आहे.

टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी Tata Punch चे एडिशन लाँच केले होते. आता कंपनी पुन्हा एक नवीन SUV लाँच करण्याची तयारी करीत आहे. या SUV च्या लाँचिंग नंतर मिड साइज एसयूव्ही सेगमेंट मध्ये जबरदस्त स्पर्धा वाढणार आहे.

टाटा ब्लॅकबर्ड SUV लॉन्च करणार.

टाटा मोटर्स भारतामध्ये आपली बहुप्रतिक्षित Tata Blackbird SUV आणण्याची तयारी करीत असून कंपनीच्या प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये या कारला टाटा हॅरियर च्या खाली आणि टाटा नेक्सॉन च्या वर प्लेस केले जाणार आहे. म्हणजेच याचे फीचर्स टाटा नेक्सॉन पेक्षा जास्त दमदार असणार आहेत.

कूपे डिझाइन सोबत येईल ब्लॅकबर्ड

टाटा ब्लॅकबर्ड कूपे डिझाइन लँग्वेज सोबत भारतामध्ये एन्ट्री करणार आहे. कंपनी या SUV ला खास तरुणांसाठी लॉन्च करणार आहे. कारचे इंजिन संबंधी अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, या SUV मध्ये १.५ लीटरचे ४ सिलिंडर इंजिन दिले जावू शकते.

या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला All Black Theme मिळेल. ही सुद्धा शक्यता आहे की, टाटा याला थ्री रो सीटिंग बरोबर लॉन्च करू शकते. शिवाय, SUVमध्ये तुम्हाला ८.८ इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. ज्याला आपण वायरलेस ॲप्पल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो सोबत कनेक्टेड करू शकतो. यामध्ये वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनारोमिक सनरूफ आणि लेदर सीट सारखे फीचर्स या मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!