कन्नड बॉम्ब प्रकरण: उधारी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मित्राला धडा शिकविण्यासाठी ठेवला बॉम्ब..

औरंगाबाद : जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये बॉम्ब आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शेवटी या प्रकरणाचा पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावला आहे.

उधारी देण्या-घेण्याच्या व्यवहारामध्ये वाद झाल्याने एका इसमाने आपल्याच मित्राच्या दुकानासमोर बॉम्ब ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. औरंगाबादमधील कन्नड शहरात दिनांक 9 जून 2022 रोजी मध्यवर्ती रस्त्याच्या बाजूला कमी तीव्रता असलेला बॉम्ब सापडल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. या प्रकरणामध्ये कन्नड पोलीस ठाण्यात दिनेश राजगुरू यांनी अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल केला होता.

सविस्तर माहिती अशी की दिनेश राजगुरू यांच्या दुकानासमोर हा बॉम्ब ठेवण्यात आलेला होता. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याकरीता 4 पथक तयार केलेले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना हा बॉम्ब ठे वलेल्या आरोपीला शोधण्यामध्ये यश आले आहे. रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे असे या आरोपीचे नाव असून याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे.

काय म्हणाले ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया पाहा व्हिडिओ..

आरोपी रामेश्वर मोकासे आणि फिर्यादी दिनेश राजगुरू हे मित्र होते. रामेश्वर आणि दिनेश यांच्यामध्ये एका उधारीच्या जुन्या देवाण-घेवणीवरून भांडण झाले होते.

त्यामुळे रामेश्वर मोकासे याने मनात राग धरून दिनेशच्या दुकानासमोर हा बॉम्ब ठेवला असल्याची कबुली दिली असून, त्याने एका ब्लॉस्टिकच्या पाईपमध्ये रामेश्वरने बॉम्ब तयार करून मोबाईलच्या बॉक्स मध्ये हा बॉम्ब जितेंद्र याच्या दुकानासमोर ठेवला होता. पण, याची माहिती मिळाल्यावर, बॉम्बशोधक पथकातर्फे हा बॉम्ब निकामी करण्यात आला होता. अखेरीस या प्रकरणाचा उलगडा झाल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला. या प्रकरणी रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासेवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

Similar Posts