Caste Certificate Maharashtra : तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे असल्यास तर हे कागदपत्रे जोडून करा अर्ज..

Caste Certificate in Maharashtra : 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्याकरिता कागदपत्रांची जमवाजमव सुरु झाली आहे. मात्र, राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागेवरच दाखले मिळत आहेत. तर, दुसरीकडे जात पडताळणी कार्यालयातर्फे गरजू विद्यार्थ्यांना कमीतकमी एका दिवसात तर जास्तीत जास्त आठ दिवसाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे.

त्याकरिता विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे.

तसे पाहता जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कालावधी तीन महिने आहे. पण, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून समितीकडून अवघ्या ८ ते १० दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तरीही एखाद्या गरजू विद्यार्थ्याचे खरोखर नुकसान होत असल्यास समितीच्या सदस्यांची उपलब्धता पाहून एका दिवसात सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.

विद्यार्थी ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार आहेत, तेथील कागदपत्रे घेऊन समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द झाला किंवा प्रवेश मिळाला नाही, असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता समितीकडून घेतली जात आहे. Caste Validity Certificate.

आवश्यक कागदपत्रे Caste certificate online maharashtra

  • संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
  • अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो
  • अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा
  • अर्जदाराचा जातीचा दाखला (झेरॉक्स प्रत)
  • अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र
  • अर्जदाराची आत्या, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला
  • अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक)
  • वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र).

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून वेळेत अर्ज करावेत. सुरवातीला समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. त्या अर्जाची सॉफ्ट कॉपी कार्यालयात आणून जमा करावी. त्याची पडताळणी होऊन संबंधित विद्यार्थ्यास आठ ते दहा दिवसांत प्रमाणपत्र देण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने रद्द होणार नाही.

लक्षात ठेवा

● ‘एससी’ संवर्गातील विद्यार्थ्याने जात वैधता प्रमाणपत्रासाठी १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
● ‘व्हीजेएनटी’तील विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचे पुरावे जोडावेत तर

●‘ओबीसी’ व ‘एसबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे पुरावे देणे बंधनकारक आहे.

Similar Posts