कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील राज क्लॉथ स्टोअर सील..

औरंगाबाद: शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व कोरोना लसीकरण शंभर टक्के व कोरोना नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबाद शहरातील व जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार, नागरिक कोरोना नियमांचे व्यवस्थित पालन करत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच मनपा प्रशासक…

जुन्या वादातून कुऱ्हाडीने केला खून; औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील घटना..

संतोष भानुदास गल्हाटे वय 27 वर्षे, या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पैठण येथील बालानगरिमध्ये घडली असून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यात असलेले बालानगर येथील दारूच्या दुकानाच्या समोर असलेल्या मैदानावर बुधवारच्या रात्री संतोष गल्हाटे आणि त्याच्या भाऊबंध असलेला दिनेश…

तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक केले आहे, एका क्लिकवर अशा प्रकारे शोधा..

आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. हे केवळ ओळखपत्रच नाही तर विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी देखील ते तुम्हाला मदत करते. 2009 मध्ये तत्कालीन UPA सरकारने भारतात आधार कार्ड योजना सुरू केली. यानंतर, सरकारने त्याचा वापर सातत्याने केला आहे. देशात वेगाने वाढणाऱ्या डिजिटलायझेशनच्या युगात आधार कार्डची उपयुक्तता झपाट्याने वाढली…

महेश मांजरेकरांच्या “या” चित्रपटाच्या प्रोमोवर राज्यभरातुन होतोय संताप व्यक्त…

चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोंचा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाच्या ट्रेलरमधील बोल्ड आणि लैंगिक दृश्यांवर सेन्सॉरची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाण कामगारांना अशी वागणुक…

यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी फलक झळकणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.

मुंबई: राज्यातल्या प्रत्येक दुकानदाराला यापुढे आपल्या दुकानाची पाटी मराठीत लिहावी लागणार आहे. तसेच दुकानावरील मराठी भाषेत लिहिलेले नाव मोठ्या अक्षरात लिहावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयान्वये आतापासून राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत नावाचे फलक लावावे लागतील, असे आदेश देण्यात आले. सोप्या भाषेत सांगायचे तर, आतापासून प्रत्येक…

धोक्याची घंटा..! औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या जवळ..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 71 जण कोरोनामुक्त, 1839 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 60, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 519 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील…

औरंगाबादचे जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधायचाय…??

जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय होऊ नये…

आता टेन्शन फ्री होऊन रेल्वेमध्ये प्रवास करा, हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी रेल्वेने सुरू केला एक नवीन उपक्रम.

यापुढे रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्यांच्या सामानाची काळजी करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, प्रवाशी सहजपणे त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेऊन ते परत मिळवू शकतात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) प्रवाशांची तसेच त्यांच्या सामानाची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आहे आरपीएफने ‘मिशन…

आज पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्येत वाढ..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी एकूण 349 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 64 जण कोरोना मुक्त तर 1426 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 58, ग्रामीण 06) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 448 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 349 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…

माता वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू…

श्रीनगर: नववर्षाच्या सुरूवातीलाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा टेकडीवरील माता वैष्णोदेवी मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील गेट क्रमांक तीनजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १२ लोक मरण पावले असून त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी कटरा बेस कॅम्पमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत….