खळबळजनक! सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये पुरले जातात कलाकारांचे मृतदेह? वाचा सविस्तर..

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने मुंबईतील दिवाणी न्यायालयात त्याच्या शेजाऱ्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमान खानच्या शेजाऱ्याने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानवर खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर सलमान खानने हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला. सलमान खानवर लावण्यात आलेले सर्व आरोप केवळ निराधार नसून ते त्याच्या कल्पनेचे चित्रण असल्याचेही त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणात सलमान खानने सोशल मीडिया प्लॅट फॉर्मलाही पक्षकार बनवले आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये सलमान खानचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसजवळ केतन कक्कर नावाच्या व्यक्तीचा प्लॉटही आहे. केतन कक्करने अलीकडेच सलमानवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. केतन कक्कर म्हणाले होते की, सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये अनेक सिनेतारकांचे मृतदेह पुरण्यात आले आहेत. यासोबतच त्यांनी सलमान खानचे वर्णन डी कंपनीचा मुख्य चेहरा असे केले आहे. इतकेच नाही तर केतन कक्करने सलमान खान चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये सामील असल्याचा आरोपही केला आहे.

सलमानचे वकील प्रतीक गांधी यांनीही सलमानवर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. हा मालमत्तेचा वाद आहे आणि त्याचा वापर सलमानच्या प्रतिष्ठेला बदनाम करण्यासाठी करू नये, असे त्याने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात सलमानच्या वकिलाने यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि सर्च इंजिन गुगलसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलाही पक्षकार बनवले आहे. सलमानच्या वकिलाने केतन कक्करने सलमानवर लावलेले व्हिडिओ आणि आरोपांची सर्व सामग्री ब्लॉक करण्यासाठी कोर्टाला निर्देश देण्याची मागणी केली आहे.

केतन कक्कर हा अनिवासी भारतीय असून तो सध्या मुंबईत राहतो. त्यांचा प्लॉट सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसच्या शेजारी आहे. 1995 मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर केतनने येथे घर, मंदिर आणि आश्रम बांधण्यासाठी प्लॉट खरेदी केला. परंतु त्यांचे वाटप महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने रद्द केले. सरकारमध्ये सलमान खानच्या प्रभावामुळे हे घडले आणि सलमान त्याच्या जमिनीचा बेकायदेशीरपणे वापर करत असल्याचा केतनचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!