तुमच्या पॅन कार्डवर एखाद्याने तुमच्या नकळत कर्ज तर नाही ना घेतले? असं तपासा

Check Active Loans on PAN Card : सायबर गुन्हेगार तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर तुमच्या नकळत कर्ज घेऊ शकतात. तुमच्या पॅनकार्डवर एखाद्याने तुमच्या नकळत कर्ज तर घेतले असेल तर ते कसे बघायचे तेच आल्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

सध्याचे हे योग डिजिटल युगात आहे, आणि आजच्या या काळात फसवणुकीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. भोळ्या भाबड्या लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार तुमच्या पॅन कार्डचाही गैरवापर करून तुमच्या नावावर कर्जही घेऊ शकतात. यामुळे मात्र तुम्ही अडचणीत सापडू शकता. पण तुमच्या पॅनकार्डवर एखाद्या गुन्हेगाराने कर्ज तर घेतले असेल तर ते कसे चेक करायचे आणि त्याची तक्रार कुठे व कशी करायची ते जाणून घ्या.

क्रेडिट रिपोर्ट तपासात रहा

तुमच्या पॅन कार्डवर तुमच्या नकळत कोणते आणि कशा प्रकारचे कर्ज घेतले आहे हे सर्व क्रेडिट रिपोर्टमधून समोर येते. त्यामुळे नेहमी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासत रहा. क्रेडिट रिपोर्टमध्ये CIBIL, Experian, Equifax आणि CRIF High Mark हे क्रेडिट ब्युरो असतात. जे तुमच्या नावावर असलेल्या प्रत्येक कर्जाची माहिती जतन करून ठेवतात.

Check Active Loans on PAN Card

  • सर्वप्रथम
    क्रेडिट रिपोर्ट https://www.cibil.com/ या वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर तुमचं पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून “Get Free CIBIL Score & Report” या पर्यायावर क्लिक करून क्रेडिट रिपोर्ट तपासा.

यामध्ये तुम्हाला तुम्ही घेतलेल्या किंवा तुमच्या नकळत घेतलेल्या सर्व कर्जे आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळेल.

क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या पॅनकार्डवरील लोनची माहिती मिळेल

तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये पॅनकार्डवर एखादे लोन दिसत असेल ज्यासाठी तुम्ही कधीही अर्ज केला नाही, तर याठिकाणी तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर करून कोणीतरी तुमच्या नकळत कर्ज घेतल्याचे सिद्ध होते. याशिवाय त्या कर्जाच्या डिटेल्समध्ये जर एखादा चुकीचा खाते क्रमांक, किंवा अज्ञात बँकेचे किंवा कर्ज देणाऱ्याचे नाव दिसत असेल तर लगेच सावध व्हा. अन्यथा तुम्हाला जबरदस्त आर्थिक आणि मानसिक फटका बसू शकतो.

तुमच्या नावावर बनावट कर्ज असेल तर काय करायचे?

  1. तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून कर्ज घेतल्याचे दिसत असेल तर घाबरू नका. ज्या संस्थेने कर्ज दिले आहे, त्याच्याशी संपर्क साधा आणि या कर्जाबाबत माहिती सांगा. यासाठी तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल आणि तसेच कर्जाचा तपशील आणि सही असलेले एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
  2. यानंतर पोलिस स्टेशनच्या सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार दाखल करा. पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचा पुरावा द्या. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुरक्षित राहील आणि आरोपीला पकडण्यात मदत होईल.

पॅन कार्ड सुरक्षित कसे ठेवायचे?

  • तुमचा पॅन कार्ड नंबर कधीही अज्ञात वेबसाइट, ॲप किंवा व्हॉट्सॲप मेसेजवर शेअर करू नका.
  • तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर ताबडतोब ते पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज करा आणि क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा.
  • ऑनलाईन बँकिंगसाठी मोठा पासवर्ड वापरा.
  • यामुळे तुमचे खाते सुरक्षित राहील.

Similar Posts