बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..

औरंगाबाद मधील वाळूज महानगर परिसरात बजाजनगरमध्ये आँटो केअरमध्ये दुकानदार भूषण रूपचंद अग्रवाल, त्यांचे मित्र सागर चोरडिया आणि इतर ग्राहक बसलेले असताना अचानक 3-4 जण दुकानावर येऊन शिवीगाळ केली व अग्रवाल यांच्या दुकानाच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्यानंतर भूषण अग्रवाल यांनी देखील शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने भोसकण्याची पेट्रोल दुकानावर टाकून दुकान जाळण्याची धमकीही हल्लेखोरांनी दिली आहे.

या घटनेनंतर बजाजनगर परिसरात व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या मारहाणीचा कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Similar Posts