औरंगाबाद शहरात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार अटकेत.
औरंगाबाद शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी सय्यद फैसल उर्फ तेजा भाई हा बरेच दिवसापासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
तेव्हा माननीय पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली यास हर्सुल पोलीस ठाण्याचे विशेष पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रफिक शेख व सोबत नाईक पोलीस शिवाजी शिंदे, राकेश देशमुख यांनी सायबर क्राईम व गुप्त माहिती द्वारे तेजा भाई यास बीड येथून अत्यंत शिताफीने अटक केली.
तेजा भाई हा इम्रान मेहंदी गॅंगचा सदस्य आहे व त्याच्यावर शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये याचे वर नऊ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त निखील गुप्ता साहेब, माननीय पोलीस उपायुक्त दीपक गि-हे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ साहेब, पोलीस निरीक्षक अमोल देवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रफिक शेख सर पोलीस नाईक शिवाजी शिंदे पोलीस नाईक राकेश देशमुख, देवचंद मेहेर, दांडगे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक दहिफळे यांनी कामगिरी केली.