राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; थेट जनतेतून सरपंच..

कमी पाऊस असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदाच्या थेट सार्वत्रिक निवडणुका १८ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदन यांनी केले.

मदन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार, ५१ तालुके ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आले असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे अशी तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास तात्काळ सादर करावा, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती यांसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तत्काळ राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अशी असणार निवडणुकीची रणधुमाळी

१८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार असून या निवडणुकीसाठी २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहे. २ सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे. ६ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे तर १९ सप्टेंबर रोजी निकाल लागणार आहे.

Similar Posts