साक्षात मृत्यू कॅमेऱ्यात कैद; लग्नात गाणे गात असतानाच गायिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल..

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला सुखद आणि महत्त्वाचा क्षण असतो. लग्न समारंभात नाच-गाण्यांचे कार्यक्रम होतात. वऱ्हाडी मंडळी तल्लीन होऊन नाचतात.

परभणीमध्ये सुद्धा DJ च्या तालावर अशाच एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. मिरवणुकीमध्ये जल्लोष सुरु होता. DJ च्या संगीतावर एक महिला “खेळताना रंग बाई होळीचा..” हे गाणं गात असतानाच अचानक गाणं थांबलं आणि गाणे गाणारी महिला जागीच कोसळली. लग्नातील जमलेल्या नागरिकांनी तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. कुणीतरी सदरील मिरवणुकीचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये शूट करत होतं. त्यामुळे तिच्या मृत्यूचा प्रसंग कॅमेऱ्यात स्पष्टपणे टिपला गेला. संगीता गव्हाणे असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

परभणी मधील नानलपेठ परिसरात राहणाऱ्या संगीता गव्हाणे ह्या होमगार्ड होत्या, मात्र त्यांना गाणं म्हणण्याची खूप हौस होती. केवळ हौसेपोटी त्या गाणं म्हणायला कार्यक्रमात जायच्या. मात्र गेल्या शुक्रवारी झालेला लग्न सोहळा हा त्यांच्यासाठी शेवटचा कार्यक्रम ठरला.

पाहा व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!