गृहकर्ज घेतल्यावर भरावी लागते दुप्पट रक्कम! कसे असते चक्रवाढ व्याजाचे गणित? जाणून घ्या..

साधारणपणे, गृहकर्जाचा कालावधी 20 वर्षे ठेवतात. अशा परीस्थितीत गृहकर्जाचे व्याज आणि इतर बाबींचे विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या घराच्या कर्जासाठी अनेक बँका तुमच्याकडून 20 वर्षांच्या कालावधीमध्ये दुप्पट रक्कम वसूल करतात.

Home Loan finance: स्वतःचे घर असावे, स्वतःची गाडी असावी, हे प्रत्येक भारतीय नोकरदारांचे स्वप्न असते. पण यासाठी एवढी मोठी एकरकमी रक्कम आणि दैनंदिन खर्चामध्ये घर घेणे अवघड आहे. अशा परीस्थितीत गृहकर्ज घेणे हा सर्वोत्तम पर्याय दिसतो. सामान्य माणसाला हे कर्ज 25 लाख ते 40 किंवा 50 लाखांपर्यंत आहे.

पण गृहकर्जावर तुम्हाला किती व्याज द्यावे लागतील या पैलूचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण की, अनेकदा ही रक्कम खूप जास्त असते. कर्ज घेताना तुम्ही योग्य बँक अथवा योग्य फायनान्स कंपनी निवडली नाही, तर तुम्हाला जवळपास दुप्पट रक्कम भरावी लागते .

सर्वसाधारणपणे, गृहकर्जाचा कालावधी 20 वर्षाचा असतो. तुमच्या 25 लाख किंवा 30 लाखांच्या कर्जाकरीता अनेक बँका तुमच्याकडून या कालावधीत जवळपास दुप्पट रक्कम वासुलतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी वेग-वेगळ्या बँकांचे व्याजदर तपासणे योग्य ठरते.

जाणून घ्या कर्जाचे गणित

समजा तुम्ही जर घर घेण्यासाठी 25 लाखांचे कर्ज घेतले आणि हे कर्ज भरण्याची मुदत म्हणजेच EMI 20 वर्षाची निश्चित केली. साधारणपणे, विविध बँकांचे गृहकर्ज व्याजदर 6.70 टक्के ते 8.5 टक्क्यांच्या दरम्यान असते. वाढता व्याजदर आणि इतर परिस्थिती लक्षात घेता, जर तुम्ही सरासरी केली तर गृहकर्जाचा व्याजदर 7.5 ते 8 टक्के असेल.

▪️एकूण गृहकर्ज: रु. 25 लाख
▪️व्याज दर: 7.5%
▪️कर्जाचा कालावधी: 20 वर्षे
▪️मासिक EMI: रु 20140
▪️एकूण व्याज: 23,33,559 रुपये
== एकूण पेमेंट: 48,33,559

हा व्याजदर फ्लोटिंग रेट आहे म्हणजेच बदललेल्या परिस्थितीत व्याजदर बदलेल. जर व्याजदर 8 टक्के झाला, तर या प्रकरणात मासिक EMI 20911 रुपये असेल आणि एकूण व्याज 25,18,640 रुपये असेल. म्हणजेच तुम्हाला एकूण 50,18,640 रुपये बँकेत भरावे लागतील. हे तुमच्या कर्जाच्या दुप्पट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!