पोलिस भरतीसाठी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा अन्यथा रिजेक्ट व्हाल; पहा संपूर्ण लिस्ट..

💁🏻‍♂️ राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस बनून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

⁉️ मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? यासाठी कोणते डोक्यूमेंट्स असणं आवश्यक आहे? याबद्दलचे प्रश्न अनेकांना पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या पदभरतीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे जाणून घेऊया…

📑 पोलिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे –👇🏻Documents Required for Police Recruitment –

👉🏻 शाळा सोडल्याचा दाखला / 10 वी चे प्रमाणपत्र…
👉🏻 जन्म दाखला…
👉🏻 12 वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र…
👉🏻 संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून)..
👉🏻 समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र..
👉🏻 आधारकार्ड (ऐच्छीक). (Police Bharti 2022)

लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी – Remember these things –

👉🏻 प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक..
👉🏻 उमेदवारांच्या प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत..
👉🏻 मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल..
👉🏻 जात वैधता (validity) प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील..
👉🏻 उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत न्यावे..

👉🏻 उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न विसरता आणावे..
👉🏻 मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात,, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत..
👉🏻 आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे,, हे निश्चित करुन नंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा..(Police Bharti 2022)

👉🏻 नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी..
👉🏻 कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राची निर्गमित तारीख, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे गरजेचे आहेत..
जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे..
👉🏻 आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे..
👉🏻 सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही..

👉🏻 आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल..
👉🏻 सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील..
👉🏻 कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची (ॲप्लीकेशन आयडी नमूद असलेली) प्रत,, पोलीस भरतीकरीता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांची प्रिंट व २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.. (Police Bharti 2022)

📑 नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटसाठी अत्याआवश्यक असलेले कागदपत्रे – Documents required for Non-Criminal Certificate –

● वडील / आई मा. तहसीलदार कार्यालयातील मागील तीन वर्षांचा उत्पन्न दाखला..
● जातीचा दाखला..
● शाळा सोडल्याचा दाखला..
● रहिवासी दाखला..
● Renewal करायचे असल्यास एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!