Driving License Online Apply in Marathi | आता मोफत घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा.. असा करा अर्ज..
Driving License Online Apply : ड्रायव्हिंग लायसन्स सर्वांना माहितचं आहे आणि हे देखील माहित आहे की, किती महत्वाचे डॉक्युमेंट आहे. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालविण्याचा परवाना.. हे एवढे महत्वाचे कागदपत्रं आहे, जे भारतात कुठेही तुम्हाला वाहन चालविण्याची परवानगी देते.
ड्रायव्हिंग लायसन्स अतिशय महत्वाचं कागदपत्रं आहे, हे तुम्हाला समजलंच.. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) 20 वर्षे व त्याहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना दिल्या जाते. जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आणि वाहन चालवत असेल, तर दंड आकारण्यात येतो. (Driving License Online Form Maharashtra)
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला ‘आरटीओ’च्या चकरा माराव्या लागत होत्या. अनेकदा एखाद्या एजंटला चांगलेच पैसे द्यावे लागत होते. परंतु, आता तुम्हाला ‘आरटीओ’ ऑफिसमध्ये हेलपाटे मारावे लागणार नाही. आता तुम्हाला घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे. हे ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 350 रुपयांत काढू शकाल.
तुम्हाला ही स्वत:चे कोणतेही वाहन मनमोकळेपणाने चालवायचे असेल आणि त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल, तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. तुम्हाला आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊ या.. (Driving License Online Apply Maharashtra)
जर तुम्ही पहिल्यांदा ड्रायव्हिंग लायसन्स काढत असाल, तर सुरूवातीला तुम्हाला लर्निंग लायसन्स म्हणजेच शिकाऊ परवाना दिला जातो. त्यासाठी तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल. ही टेस्ट पास झाल्यानंतर, तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी पात्र व्हाल. (Driving Licence Online Apply Mumbai)
लर्निंग लायसन्स हे काही ठराविक महिन्यांसाठीच वैध असते. या काळात तुम्हाला गाडी चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल किंवा वाहन चालविण्यास शिकावे लागेल. लर्निंग लायसन्सच्या दिलेल्या मुदतीत वाहन चालविण्यास शिकून तुम्हाला कायम परवान्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागतो. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा स्टेट बाय स्टेप जाणून घेऊ या..
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ‘असा’ करा अर्ज..Driving License Online Apply
- सर्वात अगोदर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ऑफिसिअल वेबसाइट https://parivahan.gov.in/ वर जा.
- आता तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. येथे तुम्हाला राज्य निवडावे लागेल. (Driving License Online Apply in Marathi)
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. यानंतर नवीन ड्रायव्हिंग लायसन्सच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- पुढील पेजवर ड्रायव्हिंग लायसन्सचे टप्पे दिले जातील. तुम्हाला खाली सुरू असलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर शिकाऊ परवाना क्रमांक आणि जन्मतारीख भरून ‘ओके’ बटणावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल.
- अर्ज भरून, सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- ऑनलाईन फी भरल्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- यानंतर नियुक्तीची वेळ निवडावी लागेल. वेळ आणि दिवस निवडल्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये हजर राहावे लागेल.
- तुमची टेस्ट घेण्यात येईल. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्स (शिकाऊ परवाना) 15 दिवसांच्या आत तुमच्या घरपोच मिळून जाईल.
हे देखील वाचा-
घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??