समुद्रात उसळलेल्या लाटेत 8 जण गेले वाहून..! 8 पैकी 3 जण सांगली जिल्ह्यातले..

ओमान : प्रत्येक गोष्टीची स्वतःची मर्यादा असली पाहिजे, मग ते अन्न असो वा इतर काही… जर काही अतिरेक केले तर ते घातक ठरू शकते. हा मुद्दा सिद्ध करणारे एक प्रकरण समोर आला आहे. जिथे सेल्फी काढण्याच्या हव्यासापोटी लोक समुद्राच्या किनाऱ्याच्या इतक्या जवळ आले की अचानक आलेल्या मोठ्या लाटेत 8 जण वाहून गेले. या लाटेमध्ये समुद्रात वाहून गेलेले तिघे हे सांगली जिल्ह्यातले असल्याची माहिती मिळाली असून जत येथील रहिवासी वकील राजाराम म्हमाणे यांचे मोठे भाऊ आणि त्यांची दोन मुले समुद्र किनारी फिरायला गेल्यानंतर वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

ज्यामध्ये शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस म्हमाणे आणि श्रुती म्हमाणे हे तिघे जण वाहून गेले आहेत. तर पत्नी सारिका म्हमाणे बचावली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत शशिकांत म्हमाणे यांचे बंधू राजाराम म्हमाणे तातडीने दुबईला गेल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या घटनेबाबत कुटुंबाकडून दुजोरा देण्यात आला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये काही लोक समुद्राच्या लाटांमध्ये बुडताना दिसत आहेत.

देशातील ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांना केंद्र सरकार कडून शिलाई मशीन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी खालील लिंकवर शिलाई मशिन साठी अर्ज करावा.. https://www.india.gov.in/

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये समुद्राच्या जोरदार लाटा आल्या आणि लोकांना त्यांच्यासोबत कसे वाहून नेतात हे दिसत आहे. समुद्रात वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेण्याकरीता काल उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालू होते. यासंदर्भात रॉयल ओमान पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली होती आणि ऑपरेशन संदर्भातील काही फोटोही पोस्ट केले होते.

पाहा व्हिडिओ…

ओमान (Oman) येथे अल-मुघसाईल या समुद्राच्या बीचवर एकाच कुटुंबामधले 8 जण समुद्रात वाहून गेल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे सेफ्टी बॅरिअर पार करून काही लोक समुद्राच्या काठावर समुद्राच्या लाटेचे पाणी अंगावर घेऊन मस्ती करत होते. याच वेळी आलेल्या एका जोरदार लाटेमध्ये हे 8 जण वाहून गेले, त्यावेळी एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये उपस्थित असलेले लोक काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.

या घटनेतून वाचवण्यात आलेल्या तीन जणांना पॅरामेडिक्सने प्रथमोपचार देऊन पुढील उपचाराकरीता रुग्णालयात पाठवले आहे. तर समुद्रात वाहून गेलेले 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!