औरंगाबादकरानो सावधान ‘थकीत बिलामुळे वीज पुरवठा खंडित होईल, लगेच फोन करा’; महावितरणच्या नावाने बनावट मेसेज.

Dear consumer, your electricity power will be disconnected tonight at 9.30pm from electricity office because your previous month bill was not updated. Please immediately contact with our electricity officer 8391890923 Thank you ( प्रिय ग्राहक, तुमची वीज आज रात्री ९.३० वाजता वीज कार्यालयातून खंडित केली जाईल कारण तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट केले गेले नाही. कृपया आमच्या वीज अधिकारी 8391890923 शी त्वरित संपर्क साधा धन्यवाद )

असे बनावट मॅसेज ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असले बनावट मॅसेज काही नागरिकांना प्राप्त झाले असून असले कोणतेही ‘मॅसेज’ महावितरणतर्फे पाठविण्यात येत नाहीत. त्यामुळे अशा मॅसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या; परंतु महावितरणशी संबंधित ‘मॅसेज’ किंवा व्हॉटस्ॲप किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी मोबाइल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

लक्षात ठेवा महावितरण तर्फे केवळ मोबाइल क्रमांकाची नोंद केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टम -द्वारे ‘मॅसेज’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी हा “MSEDCL” असा आहे. आणि त्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Similar Posts